पुण्यातील एस एम जोशी रस्त्यावर मागील ११ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आमदार रोहित पवार व आमदार विश्वजीत कदम यांनीही या विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दिला होता. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमानवार यांच्या राजीनाम्याची या विद्यार्थ्यांची मुख्य मागणी होती. याच अनुषंगाने अकरा दिवसानंतर राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुण्यातील या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली व या दरम्यान त्यांनी मोठी घोषणा केली.
निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या सचिवपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.