अध्यात्म : सर्वपित्री अमावस्या का आली ? यामागची भयानक कथा वाचून अंगावर काटा येईल ! - टॉप न्यूज मराठी

अध्यात्म : भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू झाला की हिंदू धर्मात पितृ पक्ष सुरू होतो. 15 दिवस चालणारा हा काळ आपल्या पूर्वजांचा काळ मानला जातो. या 15 दिवसांच्या शेवटच्या दिवशी येते ती म्हणजे सर्वपित्री अमावस्या. या दिवशी सर्व पितरांची एकत्र विदाई केली जाते. पण ही अमावस्या का आली, यामागे दोन अशा कथा आहेत ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल.

पहिली कथा आहे दानवीर कर्णाची

महाभारतातील कर्ण हा आयुष्यभर सोन्याचे, चांदीचे दान करत राहिला. त्याने कधीही कोणाला रिकाम्या हाताने पाठवले नाही. पण त्याने चुकूनही कधीही अन्नाचे दान केले नव्हते. मृत्यूनंतर जेव्हा कर्ण स्वर्गात गेला तेव्हा त्याला राहायला महाल मिळाला, पण जेवायला दिले तर सोने चांदी. कर्णाने यमराजाला विचारले की मला जेवायला सोने का दिले जात आहे.

तेव्हा यमराज म्हणाले की तू आयुष्यभर सोन्याचेच दान केलेस, अन्नदान कधीच केले नाहीस, त्यामुळे स्वर्गातही तुला सोनेच खावे लागत आहे.

तेव्हा कर्ण म्हणाला की मला माहीतच नव्हते की माझे वडील कोण आहेत, माझ्या पूर्वजांबद्दल मला काहीच माहिती नव्हती, त्यामुळे मी पितरांसाठी पिंडदान कसे करणार. कर्णाची ही व्यथा ऐकून यमराजाने त्याला 15 दिवसांसाठी पुन्हा पृथ्वीवर पाठवले. या 15 दिवसात कर्णाने भरपूर अन्नदान केले, पिंडदान केले आणि आपल्या पितरांना तृप्त केले. तेच 15 दिवस म्हणजे पितृ पक्ष. आणि ज्या दिवशी तो परत स्वर्गात गेला तो दिवस होता सर्वपित्री अमावस्या. म्हणून या दिवशी दान केले तर कर्णासारखे पुण्य मिळते असे मानले जाते.

दुसरी कथा आहे पितृ लोकातील आत्म्यांची

गरुड पुराणात सांगितले आहे की यमलोकात दोन प्रकारचे लोक असतात, एक दक्षिण दिशा जिथे पापी लोकांना शिक्षा मिळते आणि एक पितृ लोक जिथे आपले चांगले पूर्वज राहतात.

वर्षभर पितृ लोकातील आत्मे आपल्या कुटुंबाकडे पाहत असतात की माझ्या मुलाने माझ्यासाठी पाणी तरी दिले का. पण पृथ्वीवरचे लोक त्यांना विसरून जातात. म्हणून ब्रह्मदेवाने नियम बनवला की वर्षातून 15 दिवस सर्व पितरांना पृथ्वीवर येण्याची परवानगी असेल. या 15 दिवसात ते आपल्या घराच्या दारात, पिंपळाच्या झाडावर, गायीच्या गोठ्यात वास करतात.

ते वाट पाहतात की कोणीतरी आम्हाला पाण्याचा एक घोट तरी देईल का, कावळ्याच्या रूपात, गायीच्या रूपात, कुत्र्याच्या रूपात ते घराभोवती फिरतात.

जर 14 दिवसात एखाद्या पितराचा कोणीच श्राद्ध करत नसेल, त्याला कोणीच जेवण देत नसेल तर तो आत्मा नाराज होतो. म्हणून शेवटचा दिवस ठेवला आहे सर्वपित्री अमावस्या. या दिवशी ज्या पितरांची तिथी माहिती नाही, ज्यांचा कोणीच नाही, ज्यांना सगळे विसरले आहेत, त्या सर्वांसाठी एकत्र श्राद्ध केले जाते. जेणेकरून एकही आत्मा उपाशीपोटी परत जाणार नाही.

म्हणून या दिवशी घरात भांडण करू नये, कारण दारात तुमचे पूर्वज उभे असतात. या दिवशी दुपारी 12 वाजता दक्षिण दिशेला तोंड करून काळे तीळ आणि पाणी सोडून पितरांना नमस्कार करावा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या दिवशी कावळा, गाय आणि कुत्र्याला जेवण दिल्याशिवाय स्वतः जेवू नये.

ज्या घरात सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केले जाते, त्या घरातील 7 पिढ्यांचे पितृदोष संपतात आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही असे सांगितले जाते.