डेंग्यूची साथ वाढली ! पुणे, मुंबईत रुग्णांमध्ये मोठी वाढ, ही लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा - टॉप न्यूज मराठी

पुणे आणि मुंबईत सध्या डेंग्यू, चिकनगुनिया आणि व्हायरल फिवरच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. परतीच्या पावसामुळे साचलेले पाणी आणि वाढलेली आर्द्रता यामुळे डासांची पैदास वाढली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत यंदा डेंग्यूच्या केसेस गेल्या वर्षीच्या तुलनेत 28% ने वाढल्या आहेत. 

पुण्यात सुद्धा हवामानातील चढ-उतारामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की, हवामान बदलामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर ताण येतो आणि संसर्ग वाढतो. 

सर्वात जास्त रुग्ण कुठे?

BMC च्या आकडेवारीनुसार दादर, परेल, प्रभादेवी, वाळकेश्वर, बांद्रा, घाटकोपर या भागात जास्त रुग्ण आढळत आहेत. पुण्यात ठेरगाव, भोसरी, चिखली, पिंपरी, सांगवी, पिंपळे सौदागर मध्ये केसेस जास्त आहेत.

डेंग्यूची मुख्य लक्षणे - दुर्लक्ष करू नका

पुण्यातील डॉक्टरांच्या मते 15-20% व्हायरल फिवरचे रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघत आहेत. ही लक्षणे असतील तर लगेच तपासणी करा

1. अचानक खूप ताप येणे - दिवसभर कमी आणि संध्याकाळी जास्त ताप

2. डोळ्यांच्या मागे दुखणे आणि तीव्र डोकेदुखी

3. अंगदुखी, सांधेदुखी

4. उलट्या होणे, जुलाब

5. अंगावर लाल पुरळ येणे

6. प्लेटलेट्स झपाट्याने कमी होणे - काही रुग्णांमध्ये 5,000 पर्यंत प्लेटलेट्स खाली येत आहेत.

बचाव कसा कराल ? 

डेंग्यूचा डास हा स्वच्छ साचलेल्या पाण्यात तयार होतो. आणि 80% डासांची पैदास घरातच होते - कुंड्या, फेंगशुई झाडे, फ्रीजच्या मागचा ट्रे, टायर, कुलरमध्ये.

1. घरात कुठेही पाणी साचू देऊ नका, दर 3 दिवसांनी कुंड्या, टाक्या स्वच्छ करा.

2. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, मच्छर अगरबत्ती, लाव्हा.

3. ताप आल्यास स्वतःहून औषध घेऊ नका, लगेच जवळच्या सरकारी दवाखान्यात जा.

4. भरपूर पाणी प्या, स्वच्छ पाणी प्या.