डेक्कन पोलिसांची मोठी कारवाई, एरंडवणे भागात गणेश मंडळाकडे खंडणी मागणारे पाच जण अटकेत - टॉप न्यूज मराठी

पुणे : डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एरंडवणे भागात दरोड्याच्या तयारीत असलेले पाच आरोपींना धारदार हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई डेक्कन पोलिसांनी केली आहे.

डेक्कन पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने डेक्कन पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अचानक मित्र मंडळ (दावडी), एरंडवणे, पुणे याठिकाणी गणेश मंदिराच्या मागील बाजूस 07 ते 08 इसम हे धारदार हत्यारे, लाल तिखट व इतर साहित्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीने लपून बसलेले आहेत. त्यानुसार डेक्कन पोलीस ठाणेकडील अधिकाऱ्यांनी व स्टाफ सदर ठिकाणी जाऊन पाहणी करता अचानक मित्र मंडळ, एरंडवणे पुणे समोर एका दोन मजली इमारतीच्या पलीकडे मज्जावार गेले असता आतमध्ये 5 इसम दिसले. त्यांच्याकडे पाहणी केली असता एका इसमाने दरवाजा उघडला असता सदर ठिकाणी पाच इसम मिळून आले. तसेच तेथे त्यांनी परिसरात दहशत पसरवण्यासाठी लाल रंगाची चटणी पावडर व इतर साहित्य मिळून आले. त्यावरून डेक्कन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 280/2025 / 2025, भा.न्या.सं कलम 310(4) सह आर्म ऍक्ट कलम 4(25), सह म.पो.का.कलम 37 (1) सह 135, अन्वये गुन्हा दाखल असून दाखल करण्यात आला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रितेश गुनवण थिया, वय 25 वर्षे, रा. 56, रेंज हिल्स, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, समोर, समता भूमी, पुणे 2) विकास नितीन लांबोर, वय 19 वर्षे, रा. प्लॉट नं 15, संजीवनी हॉस्पिटल जवळ, खिलारेवाडी पुणे 3) प्रतिक हनुमंत कांबळे, वय 19 वर्षे, रा. सीडीएसएस कंपनीजवळ, गणेशनगर चाळ नं 10, एरंडवणे, अलंकार, पुणे 4) प्रतिक रामचंद्र कदम उर्फ बाळू, वय 23 वर्षे, रा. प्लॉट नं 15, संजीवनी हॉस्पिटल जवळ, खिलारेवाडी पुणे 5) सुजल मनोज मोरे, वय 19 वर्षे, रा. चाळ नं ए/78/2, खोलीनं 20, इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त श्री. कृषिकेश रावले, सहा पोलीस आयुक्त, विभाग 1, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रणजित मुळूक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजितसिंह परदेशी, सपोनि देवतळे, यांच्या सुसंगतीने डेक्कन पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक योगेश मोरे, अजय भोसले, सहा. पो. फौजदार दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र माळगे, धनंजय सुर्वेकर, तसेच पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, सागर घाडगे, दत्तात्रय सिद्धकी, धनाजी गाडी, स्वप्निल गायकवाड यांनी केली आहे.