पर्यटन : पुण्यातून तिरुपती बालाजीला जायचे आहे ? ट्रॅव्हल पासून दर्शनापर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर - टॉप न्यूज मराठी

तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात जास्त भाविक येणारे मंदिर आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमला डोंगरावर वेंकटेश्वर स्वामींचे हे मंदिर आहे. याला सात डोंगरांचा देव असेही म्हणतात.

अध्यात्मिक महत्व आणि कथा

पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने कलियुगात लोकांचे दुःख दूर करण्यासाठी वेंकटेश्वर अवतार घेतला. लक्ष्मी देवी रुसून गेल्यानंतर विष्णूने तिरुमला डोंगरावर तप केले. इथे त्यांनी पद्मावती देवीशी विवाह केला. विवाहासाठी कुबेराकडून कर्ज घेतले आणि आजही भाविक जे दान करतात ते त्या कर्जाची परतफेड आहे असे मानले जाते. त्यामुळेच इथे हुंडीत दान करण्याला खूप महत्व आहे. दररोज लाखो भाविक इथे नवस फेडण्यासाठी येतात.

पुण्यातून अंतर आणि कसे जायचे

पुणे ते तिरुपती अंतर सुमारे 1000 ते 1100 किलोमीटर आहे.

1. ट्रेनने - हा सर्वात सोयीचा आणि स्वस्त मार्ग आहे.

पुणे जंक्शन वरून रेनिगुंटा किंवा तिरुपतीसाठी थेट ट्रेन आहेत. 16381 कन्याकुमारी एक्सप्रेस, 11041 चेन्नई एक्सप्रेस. प्रवास 18 ते 20 तास लागतो. पुण्यातून रात्री 10 वाजता निघालात तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 ते 2 वाजता रेनिगुंटाला पोहोचता. रेनिगुंटा ते तिरुपती फक्त 10 किलोमीटर आहे, ऑटो किंवा बसने 20 मिनिटात पोहोचता येते.

2. फ्लाईटने - सर्वात जलद मार्ग.

पुणे एअरपोर्ट ते तिरुपती एअरपोर्ट थेट फ्लाईट नाही, पण हैदराबाद किंवा बेंगलोर मार्गे जाता येते. डायरेक्ट फ्लाईट असेल तर 2 तासात पोहोचता. तिरुपती एअरपोर्ट ते तिरुमला 35 किलोमीटर आहे. तिथून टॅक्सी किंवा TTD ची बस मिळते.

3. बसने - प्रायव्हेट व्हॉल्वो स्लीपर बस पुणे ते तिरुपती 19 ते 20 तास घेते. स्वारगेट वरून रात्रीच्या बसेस असतात.

4. कारने - पुणे - सोलापूर - हैदराबाद - कर्नूल - तिरुपती हा रूट आहे. साधारण 16 ते 18 तास लागतात.

पुण्यातून गेल्यावर तिरुपती ते तिरुमला डोंगरावर जाण्यासाठी दोन घाट रस्ते आहेत. TTD च्या फ्री बस आणि जीप सतत चालू असतात. 30 किलोमीटरचा घाट 1 तासात पार होतो.

दर्शन पास सुविधा आणि वेळ

तिरुपती मंदिर जवळपास 22 तास उघडे असते. सकाळी 2.30 वाजता उघडते आणि रात्री 1.30 वाजता बंद होते.

मुख्य दर्शन प्रकार -

सर्व दर्शन - हे फ्री आहे. यासाठी कोणतेही तिकीट लागत नाही. पण गर्दी जास्त असल्याने 15 ते 24 तास लागू शकतात. सणाच्या दिवशी 30 तास पण लागतात.

स्लॉटेड सर्व दर्शन - हे पण फ्री आहे, पण टोकन घ्यावे लागते. सकाळी 5 वाजता टोकन वाटप सुरू होते.

स्पेशल एन्ट्री दर्शन - याला 300 रुपये तिकीट आहे. हे सर्वात जास्त लोक घेतात. यासाठी 2 ते 4 तासात दर्शन होते. हे तिकीट http://ttdevasthanams.ap.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 60 दिवस आधी बुक करावे लागते.

VIP ब्रेक दर्शन - 500 रुपये आणि श्रीवाणी ट्रस्ट देणगीवर मिळते. 1.5 ते 3 तासात दर्शन होते.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी दुपारी 3 वाजता वेगळी रांग आहे.

लहान मूल 1 वर्षाखालील असेल तर पालकांना फ्री दर्शन मिळते.

मार्च 2026 पासून नवीन नियम - 300 रुपयांच्या तिकिटावर जो टाइम स्लॉट दिला आहे त्याच वेळेत रांगेत उभे राहावे लागते. लवकर किंवा उशिरा गेलात तर सोडत नाहीत.

राहण्याची सोय

तिरुमलामध्ये TTD चे स्वतःचे गेस्ट हाऊस आहेत, ते ऑनलाईन बुक होतात. भाडे 100 रुपयांपासून सुरू होते. तिरुपती शहरात 3 स्टार हॉटेल 1500 ते 3000 रुपयात मिळते. पुण्यातून पॅकेज घेतले तर हॉटेल त्यातच असते.

खाण्याची सोय

तिरुमलामध्ये TTD चे अन्नप्रसादम कॉम्प्लेक्स आहे, तिथे दिवसभर मोफत जेवण मिळते. सकाळी उपमा, दुपारी भात सांबार, रात्री पोंगल. बाहेर हॉटेलमध्ये फक्त शाकाहारी जेवण मिळते. मांसाहार आणि दारू पूर्णपणे बंद आहे.

केस काढण्याची प्रथा

तिरुपतीला केस दान करणे खूप पवित्र मानले जाते. याला मुंडन म्हणतात. मान्यता अशी आहे की आपला अहंकार केसांसोबत देवाला अर्पण करतो. देवाने आपली मनोकामना पूर्ण करावी म्हणून नवस म्हणून केस काढतात. कल्याणकट्टा नावाच्या ठिकाणी हजारो न्हावी 24 तास केस कापतात. हे केस विकून TTD ला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते.

इतर पाहण्याची ठिकाणे

तिरुपतीला गेल्यावर फक्त बालाजीचे दर्शन घेऊन परत येऊ नका.

पद्मावती मंदिर - तिरुपती पासून 5 किलोमीटरवर अलमेलू मंगलापुरम येथे आहे. ही बालाजीची पत्नी आहे.

कपिल तीर्थम - धबधब्याजवळचे शंकराचे मंदिर.

गोविंदराज स्वामी मंदिर - तिरुपती शहरातील सर्वात जुने मंदिर.

श्री कालहस्ती मंदिर - तिरुपतीपासून 35 किलोमीटरवर, राहू केतू पूजेसाठी प्रसिद्ध.

सिलाथोरनम - नैसर्गिक दगडाची कमान.

पुण्यातून जाणाऱ्यांसाठी महत्वाच्या टिप्स

1. दर्शन तिकीट 2 महिने आधीच बुक करा.

2. ड्रेस कोड पाळा - पुरुषांना धोतर किंवा पायजमा कुर्ता, महिलांना साडी किंवा सलवार.

3. मोबाईल, कॅमेरा मंदिरात नेण्यास बंदी आहे, लॉकरमध्ये ठेवावा लागतो.

4. लाडू प्रसाद घ्यायला विसरू नका, 300 रुपयांच्या तिकिटावर 2 लाडू फ्री मिळतात.

5. पायी डोंगर चढायचे असेल तर अलिपिरी मार्गे 11 किलोमीटर आणि श्रीवारी मेट्टू मार्गे 2.1 किलोमीटर चालावे लागते, यावर दिव्य दर्शनचे फ्री टोकन मिळते.

 माहिती स्त्रोत : इंटरनेट