मनोरंजन विश्व : बॉलिवूडचे पॉवर कपल रणवीर दीपिकाच्या घरी दुसऱ्या मुलीचा जन्म ! - टॉप न्यूज मराठी

मनोरंजन विश्व : बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत. दीपिका आणि रणवीरने दुसरी मुलगी झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही मुलगी 19 सप्टेंबर 2026 रोजी जन्माला आली आहे. 

दीपिका आणि रणवीर यांनी इंस्टाग्रामवर संयुक्त पोस्ट करून ही बातमी दिली. त्यांनी एका छोट्याशा बाळाच्या पावलाचा फोटो शेअर केला असून त्यावर लिहिले होते, वेलकम बेबी गर्ल, 19-9-2026, दुआ, दीपिका आणि रणवीर. पोस्ट सोबत त्यांनी नजर लागू नये म्हणून इव्हिल आयचा इमोजी लावला होता. 

विशेष म्हणजे या बाळाचा जन्म राधाष्टमीच्या दिवशी झाला आहे. त्यामुळे चाहत्यांकडून दुसरी लक्ष्मी आली अशा शुभेच्छा येत आहेत. या बाळाच्या जन्माच्या एक दिवस आधी म्हणजे 18 सप्टेंबरला दीपिका आणि रणवीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला गेले होते. पहिल्या बाळाच्या वेळी सुद्धा त्यांनी असेच मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला होता. 

दीपिका आणि रणवीरने दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा 19 एप्रिल 2026 रोजी केली होती. त्यांनी दुआच्या हातात प्रेग्नंसी टेस्ट किट असलेला फोटो शेअर केला होता. 

त्यांची पहिली मुलगी दुआचा जन्म 8 सप्टेंबर 2024 रोजी झाला होता. म्हणजे दोन्ही मुलींचा जन्म सप्टेंबर महिन्यातच झाला आहे. आता दुआ अधिकृतपणे मोठी बहीण झाली आहे. 

दीपिका लवकरच शाहरुख खान सोबत किंग सिनेमात दिसणार आहे आणि रणवीरचा धुरंधर सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला असून आता तो प्रलय नावाच्या सिनेमाचे शूटिंग करत आहे.