रात्रभर जागून पाठ केले तरी परीक्षेच्या दिवशी सगळे विसरून जाते का. अनेक विद्यार्थ्यांना ही समस्या असते. खूप मेहनत करूनही मार्क्स येत नाहीत. याचे कारण तुमची मेहनत कमी नाही तर पद्धत चुकीची आहे. टॉपर्स कधीच रात्रभर जागून पाठ करत नाहीत. ते काही सोप्या सायन्स ट्रिक्स वापरतात ज्यामुळे कोणताही विषय वर्षानुवर्षे लक्षात राहतो. त्या पाच ट्रिक्स कोणत्या ते पाहूया.
1. 50-10 ची ट्रिक
तुम्ही तासन्तास एकाच जागी बसून अभ्यास करता, यामुळेच कंटाळा येतो आणि विसरायला होते. आपला मेंदू जास्त वेळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. टॉपर्स 50 मिनिटे अभ्यास आणि 10 मिनिटे ब्रेक अशी पद्धत वापरतात. 50 मिनिटे पूर्ण लक्ष देऊन वाचा आणि 10 मिनिटात फिरून या, गाणी ऐका किंवा पाणी प्या. यामुळे मेंदूला ती माहिती सेव्ह करायला वेळ मिळतो. रात्रभर वाचण्यापेक्षा अशा 3 स्लॉटमध्ये वाचलेले जास्त लक्षात राहते.
2. लिहून आणि बोलून पाठ करा
फक्त डोळ्याने वाचून पाठ होत नाही. जे वाचता ते एका वहीत स्वतःच्या भाषेत लिहून काढा. शब्दच्या शब्द पुस्तकातले लिहू नका, तुम्हाला जसे समजले तसे लिहा. आणि ते मोठ्याने बोलून वाचा. जेव्हा तुम्ही लिहिता आणि बोलता तेव्हा तुमचे डोळे, कान आणि हात तिन्ही एकाच वेळी काम करतात. यामुळे ती गोष्ट तीन पटीने जास्त लक्षात राहते. टॉपर्सचे नोट्स नेहमी स्वतः बनवलेले असतात, बाजारातल्या गाईडमधले नसतात.
3. झोपण्यापूर्वी 15 मिनिटे रिव्हीजन
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे वाचता ते मेंदू रात्रभर सेव्ह करत असतो. म्हणून झोपण्यापूर्वी 15 मिनिटे दिवसभरात वाचलेले फक्त चाळा. पुन्हा पूर्ण वाचू नका, फक्त पॉईंट्स वरून नजर फिरवा. सकाळी उठल्यावर तुम्हाला ते आपोआप आठवेल. रात्रभर जागून वाचण्यापेक्षा रात्री 11 वाजता झोपून सकाळी 5 वाजता उठून वाचलेले जास्त लक्षात राहते, कारण झोप मेंदूसाठी खूप गरजेची आहे.
4. स्टोरी बनवण्याची ट्रिक
इतिहासाच्या तारखा किंवा सायन्सची नावे पाठ होत नाहीत का. मग त्याची गोष्ट बनवा. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची नावे लक्षात ठेवायची असतील तर त्याची एक मजेदार गोष्ट बनवा. आपला मेंदू गोष्टी कधीच विसरत नाही. फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट किंवा गाणे बनवा. जसे BODMAS आपण गाण्यासारखे पाठ केले तसे. अवघड विषयाला सोप्या गोष्टीत बदला की तो कधीच विसरणार नाही.
5. दुसऱ्याला शिकवा
कोणताही विषय पक्का करायचा असेल तर तो दुसऱ्याला शिकवा. तुमच्या मित्राला किंवा भावंडाला तुम्ही वाचलेला धडा समजावून सांगा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला समजावता तेव्हा तुम्हाला स्वतःला तो विषय 100 टक्के समजला आहे का हे कळते. जिथे अडकाल तिथे तुम्ही विसरता हे लक्षात येईल. टॉपर्स नेहमी ग्रुप स्टडी करतात याचे कारण हेच आहे. एकदा शिकवले की तो विषय कधीच विसरत नाही.
या पाच ट्रिक्स वापरून पहा. रात्रभर जागून तब्येत खराब करण्यापेक्षा स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा. रोज थोडा थोडा पण पक्का अभ्यास केला तर कोणताही विषय अवघड वाटणार नाही.