उद्या गौराईचे घरोघरी आगमन ! तयारी झाली का ? पूजेपासून फराळ आणि सजावटीपर्यंत लागणाऱ्या सामानाची संपूर्ण यादी - टॉप न्यूज मराठी

उद्या भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी आवाहन आहे. अनेक घरात माहेरवाशिणीच्या रूपात गौराईचे आगमन होईल. ऐनवेळी धावपळ नको म्हणून आजच ही यादी तपासा.

1. गौरी स्थापना आणि पूजेचे साहित्य

मूर्ती किंवा मुखवटे - दोन गौरी, सोबत गणपतीची स्थापना असेल तर लागणारे आसन

लाल किंवा पिवळे पाट - दोन

नवीन साडी, ब्लाउज पीस, बांगड्या, मंगळसूत्र - दोन गौरींसाठी

ओटीचे साहित्य - तांदूळ, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड

पूजेसाठी - हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, चंदन

फुले - झेंडू, जाई जुईच्या माळा, कमळ, दुर्वा, बेलपत्र, आघाडा

पत्री - 16 प्रकारची पत्री

दिवा, समई, तेल, वात, कापूर, उदबत्ती, धूप

नारळ - 2 ते 3, विड्याची पाने, सुपारी

तांब्या भांडे, पळी, पंचामृत - दूध, दही, तूप, मध, साखर, आरसा, फणी, टिकलीचे पॅकेट

हळदी कुंकवासाठी लहान वाट्या

2. सजावटीचे साहित्य

मखर किंवा सजावटीसाठी कापड, पडदे

लाईटिंग - झिरमिळ्या, एलईडी माळा

रांगोळी, रांगोळीचे रंग, ठिपक्यांची रांगोळी

तोररण - आंब्याच्या पानाचे, फुलांचे तोरण

खेळणी - भातुकली, लहान मातीची भांडी, स्वयंपाकाचा सेट

गौरीसमोर मांडण्यासाठी धान्य - गहू, तांदूळ, पाच प्रकारची धान्य

3. फराळ आणि नैवेद्याचे साहित्य

नैवेद्यासाठी - पुरणपोळी, मोदक, लाडूचे साहित्य

फराळ - बेसन, रवा, मैदा, साखर, गूळ, खोबरे

तेल, तूप

16 भाज्यांची भाजी - परंपरेनुसार 16 भाज्या एकत्र करून भाजी करतात, त्यासाठी - भोपळा, भेंडी, गवार, बटाटा, घोसावळे, अळूची पाने, मटार, गाजर, वांगी, काकडी, कारले, दोडका, पडवळ, तोंडली, कोबी, पालक

सोलकढी, कढी, भात, चपाती

फळे - केळी, सफरचंद, पेरू, डाळिंब

4. विसर्जन आणि परतवणीसाठी लागणारे

ओटी भरण्यासाठी - साडी किंवा ओटीचे सामान

सौभाग्यवाण - हळदी कुंकू, बांगड्या

दक्षिणा

टिप - गौरी आगमनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करून उंबरठ्यावर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढा. गौरीला माहेरवाशिण मानले जाते त्यामुळे तिचे स्वागत सजवलेल्या हातांनी करा. गौरीसमोर जे धान्य मांडता त्यात नाणी ठेवण्याची प्रथा आहे. प्रत्येक घरी पद्धती वेगळी आहे. तशी लिस्ट बनवूनच ठेवा. रेडिमेड पावला घरात आजच चिटकवून ठेवा. घरातील तुळस पहा.  उद्या आगमनावेळी लागेल.