एंक्सायटी, अतिविचार वाढतोय? रात्री दहा नंतर मोबाईलवर रील बघण्याची सवय करतेय झोप खराब ! फक्त दोन रात्री हे करूनच पहा - टॉप न्यूज मराठी

आजकाल अनेकांना रात्री अंथरुणात पडल्यावर मोबाईल स्क्रोल केल्याशिवाय झोप येत नाही. इंस्टाग्राम रील, युट्युब शॉर्ट्स बघता बघता कधी बारा एक वाजतो ते कळतच नाही. ही सवय दिसायला छोटी वाटते पण शरीरावर याचा खूप मोठा आणि दीर्घकाळ परिणाम होतो. आपल्या मोबाईल स्क्रीन मधून ब्लू लाईट नावाचा प्रकाश निघतो. हा प्रकाश आपल्या डोळ्यांमधून थेट मेंदूला सिग्नल पाठवतो की अजून दिवस आहे, झोपू नकोस. त्यामुळे आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचे झोपेचे हार्मोन तयार होत नाही. मेलाटोनिन कमी झाले की झोप उशिरा येते, झोप गाढ लागत नाही आणि सकाळी उठल्यावर दिवसभर थकवा आणि डोके जड होणे असे त्रास होतात.

दुसरा परिणाम मान आणि डोळ्यांवर होतो. सतत खाली मान घालून मोबाईल बघितल्याने मानेतील नसांवर ताण येतो. याला डॉक्टर टेक्स्ट नेक असे म्हणतात. तरुण वयात मान दुखी वाढण्याचे हे एक मोठे कारण आहे. तसेच अंधारात मोबाईल बघितल्याने डोळे कोरडे होतात आणि दृष्टी कमकुवत होते. सतत रील बघितल्याने मेंदूला पण सवय लागते की सतत नवीन काहीतरी पाहिजे. त्यामुळे एकाच गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करणे कठीण होते. अभ्यास किंवा ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाही.

यावर उपाय खूप सोपा आहे पण तो पाळणे महत्वाचे आहे. रात्री दहा नंतर मोबाईलचा नाईट मोड किंवा ब्लू लाईट फिल्टर ऑन करा. झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल चार्जिंगला दुसऱ्या खोलीत किंवा लांब ठेवा. त्या अर्ध्या तासात एखादे पुस्तक वाचा, कुटुंबाशी बोला किंवा फक्त डोळे बंद करून दिवसभरात काय झाले याचा विचार करा. सुरुवातीला दोन तीन दिवस अवघड जाईल, हात सारखा मोबाईल कडे जाईल, पण नंतर सवय होईल. रात्री चांगली झोप आली तर दुसऱ्या दिवशी कामात उत्साह पण जास्त राहतो आणि चिडचिड कमी होते.