माझा छकुला चित्रपटात झळकले होते महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामी, फोटो पाहून ओळखण आहे कठीण ! - टॉप न्यूज मराठी

माझा छकुला हा मराठीतील सगळ्यात गाजलेला चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात बालकलाकार म्हणून आदिनाथ कोठारे होता. पण याच चित्रपटात महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील एक प्रसिद्ध चेहरा सुद्धा झळकला होता हे तुम्हाला माहिती आहे का. तो चेहरा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सचिन गोस्वामी आहेत. आता मोठ्या दाढीत दिसणाऱ्या सचिनला त्या जुन्या सिनेमात ओळखणं खूपच कठीण आहे.

नेमका काय होता त्यांचा रोल

चित्रपटात एक सीन आहे जेव्हा आदिनाथ आणि त्याची आई म्हणजे निवेदिता सराफ मुंबईला येतात. स्टेशनवर किंवा रस्त्यात एक हमाल जबरदस्तीने त्यांची बॅग उचलतो आणि त्यांना त्रास देतो. त्यानंतर त्यांच्यात छोटासा वाद होतो. तो हमालाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता म्हणजेच सचिन गोस्वामी होते. त्यावेळी ते अगदी तरुण होते आणि छोट्याशा भूमिकेत होते पण निवेदिता सराफ यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली होती.

कोण आहेत सचिन गोस्वामी

सचिन गोस्वामी हे आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले नाव आहे. ते फक्त अभिनेते नाहीत तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या गाजलेल्या कॉमेडी शोचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम केले आहे. अनेक कॉमेडी शो, नाटक आणि मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. पडद्यामागे राहून ते हास्यजत्राला हिट बनवण्यात मोठा वाटा उचलतात. कधी कधी ते स्वतः छोट्या छोट्या विनोदी भूमिकांमध्ये दिसतात आणि प्रेक्षकांना खळखळून हसवतात. माझा छकुला सारख्या मोठ्या चित्रपटापासून सुरुवात करून आज हास्यजत्रेचे दिग्दर्शक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.