आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. अनेकांना रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर मोबाईल 100 टक्के चार्ज असावा म्हणून रात्रभर तो प्लगमध्ये लावून ठेवला जातो. तुम्हीही असेच करता का, तर सावध व्हा. ही सवय तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
1. बॅटरी खराब होण्याचा धोका - मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावल्याने बॅटरी 100 टक्के झाल्यावरही चार्ज होत राहते. याला ओव्हरचार्जिंग म्हणतात. यामुळे बॅटरीची क्षमता हळूहळू कमी होते. बॅटरी लवकर फुगते आणि खराब होते.
2. आग लागण्याची शक्यता - रात्रभर चार्जिंग केल्याने फोन आणि चार्जर दोन्ही जास्त गरम होतात. अनेक वेळा स्वस्त किंवा लोकल चार्जर वापरल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. उशीखाली किंवा अंथरुणात फोन ठेवून चार्ज केल्यास हा धोका अधिक वाढतो.
3. स्फोट होण्याचा धोका - जास्त गरम झाल्यामुळे बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. रात्री झोपेत असताना असा स्फोट झाला तर गंभीर दुखापत होऊ शकते. गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
4. झोपेवर परिणाम - चार्जिंगला लावलेला मोबाईल सतत जवळ असल्याने त्यातून येणारे रेडिएशन आणि नोटिफिकेशनचा प्रकाश तुमच्या झोपेवर परिणाम करतो. गाढ झोप लागत नाही. सकाळी थकवा जाणवतो.
5. विजेचा धोका - रात्री व्होल्टेज कमी जास्त झाल्यास फोनवर थेट परिणाम होतो. यामुळे फोनचे सर्किट जळू शकते.
काय काळजी घ्यावी -
शक्यतो दिवसा फोन चार्ज करा. 20 ते 80 टक्के दरम्यान चार्ज ठेवणे बॅटरीसाठी चांगले असते.
चार्जिंग करताना फोन उशीखाली ठेवू नका.
नेहमी कंपनीचा ओरिजनल चार्जर वापरा.
चार्जिंगला लावून फोनवर बोलणे किंवा गेम खेळणे टाळा.
तुमची एक छोटी चूक मोठा अपघात घडवू शकते, त्यामुळे आजपासूनच ही सवय बदला.