मेष (21 मार्च - 19 एप्रिल)
या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी धावपळीची असेल, सोमवार आणि मंगळवारी कामाचा ताण जास्त जाणवेल, पण बुधवारपासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरेल, ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल, वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवतील, आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला आहे, जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे, व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट मिळेल, कुटुंबात एखाद्या मंगल कार्याची चर्चा होईल, जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल, आरोग्याच्या बाबतीत पोटाचा त्रास होऊ शकतो, बाहेरचे खाणे टाळा, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल, शुभ रंग लाल आणि शुभ अंक 9 राहील.
वृषभ (20 एप्रिल - 20 मे)
हा आठवडा तुमच्यासाठी आनंद आणि प्रगती घेऊन येईल, रखडलेली कामे या आठवड्यात मार्गी लागतील, सोमवारी एखादी चांगली बातमी मिळेल, व्यवसायात नवीन पार्टनरशिपचे योग आहेत, नोकरीत बढतीचे प्रबळ योग बनत आहेत, पैशांची आवक वाढेल पण खर्चही तेवढाच वाढेल, मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल, प्रेम संबंधात गोडवा वाढेल, विवाहित लोकांचे नाते अधिक घट्ट होईल, आरोग्य उत्तम राहील पण डोळ्यांची काळजी घ्या, प्रवासाचे योग आहेत आणि प्रवास फायदेशीर ठरेल, वादविवादापासून लांब राहा, शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 6 राहील.
मिथुन (21 मे - 20 जून)
या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असेल, तुम्ही जे काम हातात घ्याल ते पूर्ण होईल, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा निकाल चांगला लागेल, प्रेमात असाल तर जोडीदाराकडून सरप्राईज मिळेल, कुटुंबात वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल, बुधवार आणि गुरुवार हे दिवस तुमच्यासाठी लकी असतील, ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल, आरोग्य चांगले राहील, ध्यान आणि योगा केल्याने फायदा होईल, घरात एखादे नवीन इलेक्ट्रॉनिक सामान येईल, शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 5 राहील.
कर्क (21 जून - 22 जुलै)
या आठवड्याची सुरुवात थोडी तणावपूर्ण होऊ शकते, कामाचा दबाव जास्त असल्याने चिडचिड होईल, पैशाच्या व्यवहारात कोणावरही विश्वास ठेवू नका, कोणालाही उसने पैसे देणे टाळा, मंगळवार आणि बुधवारी कुटुंबात मतभेद होऊ शकतात, बोलण्यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे, गुरुवारपासून वेळ बदलेल, अडकलेले पैसे परत मिळतील, नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल, आरोग्याच्या बाबतीत सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो, वाहन चालवताना काळजी घ्या, संध्याकाळी देवदर्शनाला जाणे मनाला शांती देईल, शुभ रंग मोती आणि शुभ अंक 2 राहील.
सिंह (23 जुलै - 22 ऑगस्ट)
हा आठवडा तुमच्यासाठी भाग्याचा आहे, तुमची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, सोमवारीच एखादी मोठी आनंदाची बातमी मिळेल, नोकरीत बदल करायचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे, व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे, प्रॉपर्टी खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, समाजात तुमचा मान सन्मान वाढेल, प्रेमी युगुलांसाठी हा आठवडा रोमँटिक असेल, कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाल, आरोग्य उत्तम राहील, नवीन लोकांशी ओळख होईल जी भविष्यात कामाला येईल, खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा, शुभ रंग केशरी आणि शुभ अंक 1 राहील.
कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)
हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील, आठवड्याच्या सुरुवातीला थोडी निराशा वाटेल, पण बुधवारनंतर परिस्थिती सुधारेल, ऑफिसमध्ये तुमच्या कामात चुका होऊ शकतात त्यामुळे लक्ष देऊन काम करा, सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, आर्थिक बाबतीत खर्च जास्त होईल, पोटाशी संबंधित आजार होऊ शकतो, बाहेरचे तेलकट खाणे टाळा, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे, कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, शांत राहिल्यास प्रश्न सुटेल, शनिवार रविवार चांगले जातील, शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 5 राहील.
तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)
या आठवड्यात तुमची नवीन ओळखी होतील, या ओळखी भविष्यात तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील, व्यवसाय करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळेल, नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे, आर्थिक स्थिती मजबूत होईल, कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा प्लॅन कराल, आरोग्य चांगले राहील, अविवाहित लोकांसाठी लग्नाचे स्थळ येण्याचे योग आहेत, प्रेम संबंधात असलेल्यांना घरच्यांकडून परवानगी मिळेल, खर्चावर नियंत्रण राहील, मित्रांकडून मदत मिळेल, या आठवड्यात तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल, शुभ रंग गुलाबी आणि शुभ अंक 6 राहील.
वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)
या आठवड्यात तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल, बऱ्याच दिवसांपासूनचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल, प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत, कोर्ट कचेरीच्या कामात तुम्हाला यश मिळेल, आर्थिक लाभ चांगला होईल, मित्रांकडून वेळेवर मदत मिळेल, रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, नाहीतर बनलेले काम बिघडू शकते, आरोग्याच्या बाबतीत पाठीच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल, नवीन काम सुरू करण्यासाठी शुक्रवार चांगला आहे, शुभ रंग लाल आणि शुभ अंक 9 राहील.
धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)
हा आठवडा तुमच्यासाठी खूप आनंदाचा जाणार आहे, मुलांकडून एखादी खूप चांगली बातमी मिळेल, परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांची इच्छा पूर्ण होईल, शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना मोठे यश मिळेल, आर्थिक बाबतीत तुम्हाला अनपेक्षित लाभ होईल, धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल, कुटुंबात एखादे शुभ कार्य होईल, जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, आरोग्य उत्तम राहील, व्यवसायात नवीन कल्पना सुचतील, मित्रांसोबत वेळ घालवाल, प्रवासाचे योग आहेत, शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 3 राहील.
मकर (22 डिसेंबर - 19 जानेवारी)
या आठवड्यात तुम्हाला थोडे जपून राहावे लागेल, कामात अनेक अडथळे येतील, वरिष्ठांशी वाद घालणे टाळा, नोकरीत असाल तर कामावर जास्त लक्ष द्या, पैशाची चणचण जाणवू शकते, अनावश्यक खर्च टाळा, घरातील वयस्कर व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या, बुधवारनंतर परिस्थिती थोडी सुधारेल, मित्र मदतीला धावून येतील, कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, प्रवास टाळलेला बरा, मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा, शुभ रंग निळा आणि शुभ अंक 8 राहील.
कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)
हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम जाणार आहे, तुमची सर्व कामे वेळेवर आणि मनासारखी पूर्ण होतील, व्यवसायात चांगली प्रगती होईल, नवीन पार्टनरशिप करणार असाल तर ती फायदेशीर ठरेल, प्रेम संबंधात यश मिळेल, विवाहित लोकांचे संबंध अधिक गोड होतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल, कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, आरोग्याच्या बाबतीत थोडी सर्दी खोकल्याची शक्यता आहे, नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल, रविवारचा दिवस तुमच्यासाठी लकी असेल, समाजात मान वाढेल, शुभ रंग आकाशी आणि शुभ अंक 8 राहील.
मीन (19 फेब्रुवारी - 20 मार्च)
या आठवड्यात खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, अनावश्यक खरेदी टाळा, कामाच्या ठिकाणी लक्ष विचलित होईल, त्यामुळे चुका होऊ शकतात, कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, शांत राहून प्रकरण हाताळा, प्रवासाचे योग आहेत पण प्रवास टाळलेलाच बरा, डोकेदुखी आणि थकव्याचा त्रास होऊ शकतो, पैशाच्या व्यवहारात सावध राहा, कोणालाही जामीन राहू नका, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे, गुरुवारी एखादी चांगली बातमी मिळेल, शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 3 राहील.