उद्या जन्माष्टमी आणि शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा असेलच. मुलांना श्रीकृष्ण आणि मुलींना राधा बनवायचे आहे, पण पार्लरला जायला वेळ नाही? टेन्शन नको. घरातील वस्तूंमधूनच हा सोपा आणि टिकाऊ मेकअप करता येईल.
1. कपडे - धोतर आणि उपरणे : नवीन कपडे घ्यायची गरज नाही. पिवळे धोतर नसेल तर पिवळा रुमाल किंवा पिवळी ओढणी धोतरसारखे गुंडाळा. वरती काहीच न घातले तरी चालेल किंवा पिवळे उपरणे खांद्यावर घ्या. कमरेला छान कंबरपट्टा लावा.
2. चेहऱ्याचा मेकअप: चेहऱ्यावर हलका फाउंडेशन लावा. डोळ्यात काजळाने मोठे डोळे काढा. कपाळावर पांढऱ्या चंदनाने किंवा पांढऱ्या कुंकवाने U आकाराचा टिळा काढा आणि मध्ये लाल कुंकू लावा. गालावर हलका गुलाबी रंग लावल्यास कृष्ण अधिक गोड दिसेल.
3. दागिने आणि मुकुट: डोक्यावर सोनेरी मुकुट लावा. मार्केट मध्ये रेडी मेड मिळेल किंवा एखादी छान ओढणी रोल करून राजस्थानी पद्धतीने डोक्याला बांधा. त्यावर एक खरे किंवा कागदी मोरपीस चिकटवा. गळ्यात मोत्याची माळ, हातात बाजूबंद म्हणून सोनेरी लेस बांधा.
4. शेवटचा टच - बासरी आणि लोणी: हातात छोटीशी बांबूची बासरी द्या. एका छोट्या मडक्याला पांढरा रंग लावून त्यावर 'लोणी' असे लिहा. बाळकृष्णाचा लूक पूर्ण होईल.
1. कपडे - घागरा चोळी: गुलाबी किंवा लाल रंगाचा घागरा-चोळी बेस्ट. नसेल तर कोणताही रंगीत फ्रॉक आणि त्यावर ओढणी घेऊन घागरा बनवता येईल. ओढणी डोक्यावरून घ्या.
2. चेहऱ्याचा मेकअप: चेहऱ्यावर हलकी पावडर लावा. डोळ्यांना काजळ आणि आयलायनरने सुंदर मोठे करा. कपाळावर छोटीशी लाल बिंदी आणि बिंदीच्या वर पांढऱ्या रंगाने छोटीशी नक्षी काढा. ओठांना हलकी लिपस्टिक लावा.
3. दागिने आणि केशरचना: केसांचे दोन वेण्या घालून त्यात फुलांची वेणी लावा. गळ्यात मोत्याचा हार, कानात झुमके, नाकात मोत्याची नथ आणि हातात बांगड्या घाला. कपाळावर बोरमाळ किंवा टिकली लावल्यास लूक अधिक खुलतो.
4. शेवटचा टच - हातातले साहित्य: हातात छोटीशी मटकी किंवा फुलांची टोपली द्या. पायात पैंजण घाला म्हणजे चालताना छम-छम आवाज येईल आणि तुमची राधा राणी अधिक गोड दिसेल.
टीप: मेकअपसाठी स्किन फ्रेंडली प्रोडक्ट वापरा आणि मुलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.