मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज शनिवारी सहावा दिवस आहे. गेल्या सहा दिवसांपासून अन्न-पाण्याविना उपोषण करत असल्याने त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यांना अशक्तपणा, चक्कर येणे, रक्तदाब कमी-जास्त होणे आणि पायांमध्ये गोळे येण्याचा त्रास होत आहे. शुक्रवारी रात्री प्रकृती जास्तच बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पाणी आणि सलाईन लावण्यात आले आहे. सध्या त्यांच्या हाताला सलाईन सुरू असून ते विश्रांती घेत आहेत. मात्र, सलाईन घेतले असले तरी माघार नाही, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी आज राज्य सरकारचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश आहे. काल रात्री उशिरा आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली होती. मात्र, जरांगे पाटील आपल्या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. सातारा आणि कोल्हापूर गॅझेट लागू करण्यासाठी तात्काळ जीआर काढावा, ही त्यांची मुख्य मागणी आहे. हैदराबाद गॅझेटचा विषय न्यायालयात असल्याने सरकार त्यावर थेट निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे आजचे शिष्टमंडळ सातारा आणि कोल्हापूर गॅझेटबाबत काय ठोस आश्वासन देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पहिले उपोषण 29 ऑगस्ट 2023 रोजी अंतरवाली सराटी येथे सुरू केले होते. हे उपोषण तब्बल 17 दिवस चालले आणि 14 सप्टेंबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन ते सोडवले होते. यानंतरचा त्यांचा प्रवास
याच काळात जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबई असा पायी मोर्चा काढला. 20 जानेवारीला सुरू झालेला मोर्चा वाशीमध्ये पोहोचल्यानंतर सरकारने सगे-सोयरे मसुदा अधिसूचना काढली आणि उपोषण सुटले.
आझाद मैदान, मुंबई येथे झालेले हे उपोषण सर्वात गाजले. सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून ज्यूस पिऊन सोडले.