मनोरंजन विश्व : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने सध्याच्या हिंदी सिनेमातील वाढती हिंसा आणि शॉक व्हॅल्यू ट्रेंडवर थेट भाष्य केले आहे. अशा टॉक्सिक आणि केवळ हिंसेवर आधारित चित्रपटांचा भाग होण्यापेक्षा मी निवृत्ती पत्करेन, असे स्पष्ट वक्तव्य तिने केले आहे. केवळ काम मिळते म्हणून कोणताही प्रोजेक्ट स्वीकारणार नाही, माझ्यासाठी माझी फिल्मोग्राफी जास्त महत्त्वाची आहे, असेही तिने ठणकावून सांगितले.
तापसी सध्या तिच्या नवीन गांधारी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्याच्या चित्रपटांच्या ट्रेंड वर तिला मीडिया क्रिकेटने विचारले की, 2015 पासून आतापर्यंत हिंदी सिनेमात झालेल्या बदलाबद्दल विचारले असता तिने हे वक्तव्य केले. ती म्हणाली, मी जेव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनत होते, म्हणून माझ्यासारख्या अभिनेत्रीला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पण गेल्या काही महिन्यांतील चित्रपट पाहून मी माझ्या कुटुंबियांना मजेत म्हणाले की, कुठे रिटायर होण्याची वेळ तर आली नाही ना? तिला अभिनय खूप आवडतो पण अशा सिनेमांना स्वतःचा प्रेक्षकवर्ग असला तरी, 10 वर्षांनंतर कोणी माझी फिल्मोग्राफी पाहिली तर माझ्या कामाची मला किंवा माझ्या लोकांना लाज वाटू नये, अशी इच्छा असल्याचे तिने सांगितले.
तापसीचा हा आगामी चित्रपट गांधारी हा एक इमोशनल अॅक्शन थ्रिलर आहे, जो आज 3 सप्टेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. देवाशिष मखीजा दिग्दर्शित आणि कनिका ढिल्लन लिखित या चित्रपटात ती बाणी नावाच्या एका आईच्या भूमिकेत आहे, जी गर्दीच्या स्टेशनमध्ये हरवलेल्या आपल्या मुलीला वाचवण्यासाठी चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या टोळीविरुद्ध लढा देते. तापसीने यापूर्वी पिंक, थप्पड, मनमर्जियां, बदला, हसीन दिलरुबा सारखे आशयपूर्ण चित्रपट दिले आहेत.
दुसरीकडे ती ज्या टॉक्सिक चित्रपट ट्रेंडबद्दल बोलत आहे त्याचा संबंध यश आणि कियारा अडवाणी यांच्या आगामी टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स या चित्रपटाशी जोडला जात आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा पॅन इंडिया चित्रपट 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणार असून त्यातील हिंसा, बोल्डनेस आणि डार्क थीमवरून आधीपासूनच चर्चा रंगली आहे.