पुणे : मुंबई येथील छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, अंधेरी येथे नुकतीच राज्यस्तरीय कुडो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मानाच्या स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 'द्वितीय पारितोषिक' पटकावले असून, संपूर्ण पुणे जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर रोशन केले आहे.
या स्पर्धेत मुळशी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपापल्या वजनी गटामध्ये घवघवीत यश संपादन केले. या यशस्वी खेळाडूंचा व त्यांच्या मार्गदर्शकांचा मुळशी येथे एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. मुळशीचे DYSP मा. सुनिलकुमार पुजारी सर, मपोउनि महेश पवार, ASI संतोष कुंभार , मा. सभापती मंदाताई शेळके, पंचायत समिती सदस्या काजलताई मोरे, गटविकास अधिकारी (पं.स. मुळशी) सुधिर भागवत आणि सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. तेलंगे मॅडम यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.
प्रथम क्रमांक (सुवर्णपदक): अनन्या कोळी, श्रुती मंडलापूरे, राजरत्न अहिरे, वैष्णवी पाटील, रोशनी धोत्रे, आरुष निंबाळकर, जयेश शिंदे, निखिलेश राजपूत आणि
द्वितीय क्रमांक (रजतपदक): श्रावणी जाधव, आराध्या जावळे आणि प्रांजल सुतार.
तृतीय क्रमांक (कांस्यपदक): विहान बोरसे, माही जाधव आणि अनिरुद्ध दवणे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मा. अरविंद मोरे सर आणि किशोर शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या उत्कृष्ट प्रशिक्षणामुळेच विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन करून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.