मोठी बातमी : जरांगेंचा आजपासून एल्गार ; सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबई जाम ! नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील - टॉप न्यूज मराठी

अंतरवाली सराटी : आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या या निर्णायक लढ्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज अंतरवालीत पोहोचला आहे.

या आंदोलनातील 5 मोठे मुद्दे 

1. मुंबईचा प्लॅन B रेडी : समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्या म्हणण्यानुसार, जर सरकारने दखल घेतली नाही तर लाखो वाहनांसह मुंबईकडे कूच केले जाईल. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

2. सदावर्तेंवर कारवाईची मागणी : मराठा आरक्षणाला वारंवार विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी काळकुटे यांनी केली आहे.

3. सरकारवर गंभीर आरोप : मागण्या मान्य करण्याऐवजी सरकार वेळकाढूपणा करत आहे. यामागे मोठे षडयंत्र असून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

4. पाण्याच्या टाकीवरून आंदोलन : वैजापूरमध्ये कुणबी वैधता न मिळाल्याने पालकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जरांगे यांनी फोनवरून समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

5. प्रमाणपत्रांच्या आकडेवारीत घोळ? : सरकार सांगतंय 3.13 लाख प्रमाणपत्रे वाटली, पण प्रत्यक्षात अनेक पात्र मराठ्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. सरकारी आकडेवारी फसवी असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.