टॉपचा सल्ला ! कपाळ दुखतंय की डोळ्यांजवळ ? डोके कुठे दुखते यावरून आजार ओळखा, वाफ घेण्यापासून ते डॉक्टरकडे कधी जावे ? - टॉप न्यूज मराठी

रोज डोकेदुखी येते आणि तुम्ही सरळ पेनकिलर घेता? पण डोके कुठे दुखतंय यावरून कारण वेगळं असतं. डॉक्टर सांगतात की डोकेदुखी ही एकच नसते, त्याचे प्रकार असतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका रीलमध्ये हेच सोप्या भाषेत सांगितलं आहे.

१. कपाळापाशी आणि दोन्ही बाजूला घट्ट पट्टी बांधल्यासारखं दुखत असेल तर - 

याला टेन्शन हेडएक म्हणतात. दिवसभर मोबाईल, लॅपटॉप, कामाचा ताण, झोप कमी झाली की हा त्रास होतो. डोकं जड होतं, मान अवघडते. यासाठी पेनकिलरपेक्षा २० मिनिटे डोळे बंद करून शांत बसा, पाणी प्या, मानेचे हलके व्यायाम करा आणि स्क्रीन टाइम कमी करा. चहा कॉफी जास्त झाल्यानेही हा त्रास वाढतो.

२. डोळ्यांजवळ, गालावर आणि नाकाच्या बाजूने दुखत असेल, नाक बंद असेल तर - 

हा सायनसचा त्रास आहे. पावसाळ्यात किंवा धुळीमुळे सायनसच्या पोकळीत कफ साचतो आणि दाब येऊन दुखतं. सकाळी उठल्यावर जास्त दुखतं, वाकल्यावर दुखणं वाढतं. यासाठी दिवसातून दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्या, त्यात थोडं मीठ किंवा विक्स टाका. भरपूर कोमट पाणी प्या. धूळ आणि थंड हवेपासून लांब राहा. तीन दिवसांपेक्षा जास्त ताप आणि हिरवा कफ असेल तर डॉक्टरांना भेटा.

३. डोक्याच्या मागच्या बाजूने, मानेपासून वर येणारं दुखणं असेल तर - 

हे सहसा मानेच्या स्नायूंच्या ताणामुळे किंवा सर्व्हायकलमुळे होतं. तासनतास मान खाली घालून मोबाईल पाहणे, चुकीच्या उशीवर झोपणे हे कारण आहे. या दुखण्यात मान हलवायला त्रास होतो, कधी कधी चक्कर येते. यासाठी मोबाईल डोळ्यांच्या लेव्हलला धरा, उशी जास्त उंच नको, आणि मानेचे चिन टक व्यायाम करा. गरम पाण्याने शेक दिल्याने आराम मिळतो.

डोकेदुखी आठवड्यातून तीन वेळा पेक्षा जास्त येत असेल, उलट्या होत असतील, दृष्टी अंधुक होत असेल तर स्वतः उपचार करू नका, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.