अभिनेता रणवीर सिंहवर बंदी प्रकरण : अभिनेता रणवीर सिंगवर 'डॉन 3' चित्रपट सोडल्यामुळे बंदी आली होती. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने 2023 मध्ये 'डॉन 3' ची घोषणा केली होती, ज्यात रणवीर लीड रोलमध्ये होता. पण 'धुरंधर'च्या तुफान यशानंतर डिसेंबर 2025 मध्ये शूटिंगच्या 3 आठवडे आधीच रणवीरने प्रोजेक्टमधून माघार घेतल्याचा आरोप आहे. यामुळे FWICE ने त्याच्याविरोधात नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह म्हणजेच अप्रत्यक्ष बंदी जारी केली होती.
एक्सेलचा आरोप आहे की रणवीरच्या कमिटमेंटवर त्यांनी 200 हून अधिक लोकांसाठी हॉटेल, लोकेशन, परदेशी शूटिंगचे बुकिंग केले होते. प्री-प्रॉडक्शनवर तब्बल 45 कोटी रुपये खर्च झाला. रणवीरने शेवटच्या क्षणी चित्रपट सोडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. यासाठी त्यांनी 11 एप्रिल 2026 रोजी FWICE कडे तक्रार केली. FWICE ने रणवीरला 22 एप्रिल, 30 एप्रिल आणि 13 मे रोजी 3 वेळा बोलावले, पण तो हजर झाला नाही आणि हा विषय FWICE च्या अधिकारात येत नाही, हे कॉन्ट्रॅक्ट प्रकरण आहे असे उत्तर दिले. त्यामुळे FWICE ने 26 मे रोजी NCD जारी केले.
या वादात आता रणवीरचे वडील जगजित सिंह भवनानी यांची एन्ट्री झाली आहे. मंगळवारी त्यांनी IMPPA (इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन) मध्ये अर्ज दाखल करून एक्सेलच्या 45 कोटींच्या नुकसानभरपाईच्या मागणीला विरोध केला आहे. हा दावा बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता IMPPA ची कायदेशीर टीम आधी चौकशी करून दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. FWICE ने नंतर 3 जून रोजी आपली बंदी मागे घेतली आहे.
रणवीरने स्वतः यावर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याच्या टीमने निवेदन जारी केले आहे - "रणवीरला फिल्म इंडस्ट्रीबद्दल सर्वोच्च आदर आहे. 'डॉन 3' बद्दलच्या घडामोडींवर तो जाणीवपूर्वक शांत राहिला आहे, कारण व्यावसायिक चर्चा सन्मानाने सोडवावी. तो अफवांना उत्तर देणार नाही, त्याचे लक्ष त्याच्या कामावर आहे." सध्या तो 'प्रलय' या झॉम्बी थ्रिलरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.