मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता थेट खाद्य त;लावर हात घातला आहे. "सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र" मोहिमेअंतर्गत राज्यभरात मोठे धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. अॅनालॉग पनीरवर बंदी आणि शालेय कॅन्टीनमधील मेन्यू बदलानंतर आता मुंढे यांनी सुट्ट्या खाद्यतेलाला टार्गेट केले आहे.
1. सुट्ट्या तेलावर संपूर्ण बंदी
राज्यात आता कोणत्याही प्रकारचे खाद्य तेल सुट्टे स्वरूपात विकता येणार नाही. हा नियम आधीपासून होता, पण आता कडक अंमलबजावणी होणार आहे. किरकोळ दुकानदारांनाही सुट्टे तेल विकता येणार नाही.
2. फक्त पॅकेजिंग तेल विकावे लागेल
सर्व तेल कंपनीने नोंदणी केलेल्या ब्रँडचे, पॅकिंग केलेले आणि लेबल असलेले तेलच विकावे लागेल. तेल कुठून आले याचा स्त्रोत माहित असणे बंधनकारक आहे.
3. मोहरी तेलात 100% शुद्धता बंधनकारक
मोहरीचे तेल म्हणून जे विकले जाईल ते 100 टक्के मोहरीचेच असावे लागेल. त्यात कोणतेही अनधिकृत मिश्रण करता येणार नाही.
4. हॉटेल्सना तळणीच्या तेलावर बंधन
हॉटेल आणि फूड स्टॉलमध्ये तळणीचे तेल वारंवार वापरता येणार नाही. त्यामुळे होणाऱ्या विषबाधेचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय.
नियम मोडल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. नागरिकांनीही सुट्टे तेल खरेदी करू नये, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे. नोंदणी नसलेल्या अनेक कंपन्यांमध्ये भेसळ आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.