पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी येथे काल (१२ ऑगस्ट २०२६) सायंकाळी माजी राज्यपाल आणि डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून पाटील परिवाराचे सांत्वन केले व दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती व ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या कुलपती व अध्यक्षा डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूरचे कुलपती व अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व आमदार श्री. सतेज डी. पाटील, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचे प्र-कुलपती व डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉ. सौ. स्मिता जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणेचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पी. पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांनी उपस्थितांच्या सांत्वनपर भेटींचा स्वीकार केला.