" तुरुंगात असताना मी आयुष्य संपवण्याचाही विचार केला होता ! " पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक असतानाचा राज कुंद्राने सांगितला 'तो' किस्सा - टॉप न्यूज मराठी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आहेत. 2021 मध्ये झालेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणातील अटके दरम्यान त्यांनी काय मानसिक संघर्ष सहन केला, याबतचा एक धक्कादायक किस्सा त्यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये शेअर केला आहे.

या पॉड कास्टमध्ये कुंद्रा म्हणाले की, " आर्थर रोड तुरुंगातील 63 दिवस त्यांच्यासाठी सर्वात कठीण होते. जेव्हा नाव खराब होतं, बिझनेस अडचणीत येतो आणि कुटुंबासमोर प्रश्न उभा राहतो तेव्हा माणूस आतून तुटतो. त्या काळात मी आयुष्य संपवण्याचाही विचार केला होता. पण मुलांसाठी आणि शिल्पासाठी स्वतःला सावरलं," असे ते म्हणाले.

नक्की प्रकरण काय होतं ? 

जुलै 2021 मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने राज कुंद्राला अटक केली होती. आरोप असा होता की त्यांच्या कंपनीने अश्लील व्हिडिओ शूट करून ते `Hotshots` नावाच्या ॲपवर पैसे घेऊन दाखवले. 

या प्रकरणात राज कुंद्रा जवळपास 2 महिने न्यायालयीन कोठडीत होते. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांना 50 हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. त्यांनी सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळले होते. या प्रकरणाची सुनावणी अजूनही कोर्टात सुरू आहे. राज कुंद्राने याआधी सांगितले होते की, त्यांना फक्त ॲपच्या टेक्निकल आणि फायनान्स बाजूची माहिती होती. कंटेंट काय आहे याची त्यांना कल्पना नव्हती.

राज कुंद्रा नेमका काय बिझनेस करतो ?

1. व्हायन इंडस्ट्रीज - फिटनेस आणि हेल्थ प्रोडक्ट्सची कंपनी

2. बेस्ट डील टीव्ही - होम शॉपिंग चॅनेल 

3. राज कुंद्रा प्रोडक्शन - चित्रपट आणि वेबसीरिज निर्मिती

4. क्रिप्टो आणि NFT - गेल्या 2 वर्षात ते क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल अॅसेटमध्ये गुंतवणूक करत आहेत

5. IPL टीम - 2009 मध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्स टीममध्ये गुंतवणूक केली होती

याशिवाय शिल्पा शेट्टीसोबत मिळून त्यांचा `Viaan Industries` अंतर्गत योगा आणि फिटनेस ब्रँडही आहे.

 माहिती स्रोत - इंटरनेट