पुणे:
कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दत्तगुरूंची आरती संपन्न झाली. या प्रसंगी ट्रस्टच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष विवेक भरगुडे, वर्षा थोरवे, खजिनदार सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषा खेडेकर, विश्वस्त पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.