चिंता वाढली : सौदी अरेबियात जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला - टॉप न्यूज मराठी

विदेश : आजची सर्वात धक्कादायक आणि चिंता करायला लावणारी बातमी समोर येत आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे जगातील सर्वच देशांना वेगवेगळ्या पद्धतीने नुकसान सहन करावे लागत आहे. अशातच आता आज सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे तेल कंपनीला मोठा धोका निर्माण झाला आहे, तर अनेक देशांची चिंता यामुळे वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियामध्ये आज सकाळी मिसाइल आणि ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टीमला हे हल्ले रोखण्यात असमर्थता आली आहे. जिझान मधील सौदीच्या महत्त्वाच्या केंद्राला मिसाइल हल्ल्याने टार्गेट करण्यात आले होते. दरम्यान, जगातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, सौदी सिविल डिफेन्स फोर्सने यानबू प्रांतासाठी आपातकालीन अलर्ट जारी केल्याची माहिती मिळत आहे.

या हल्ल्यामुळे जगभरातील अनेक देशांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.अद्याप कोणत्याही संघटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र याआधीही सौदीच्या तेल कंपन्यांवर येमेनच्या हुती बंडखोरांनी ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले आहेत. त्यामुळे संशयाची सुई पुन्हा त्यांच्याकडेच आहे.सौदी सरकारने हल्ल्याची चौकशी सुरू केली असून सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे.सध्या जगभरातील शेअर बाजार आणि तेल बाजार या बातमीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.