पुण्याची तहान भागली ! खडकवासला, चासकमान, मुळशीतून पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा - टॉप न्यूज मराठी

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज सकाळपासूनच खडकवासला, चासकमान आणि मुळशी या धरणांमधून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

खडकवासला धरण प्रणाली - सकाळी 8:00 वाजेपर्यंतची आकडेवारी

प्रणालीची एकूण उपयुक्त साठवण क्षमता 29.15 TMC पैकी 19.27 TMC म्हणजे 66% पाणीसाठा उपलब्ध आहे.

- खडकवासला: 1.43 TMC 73% भरले

- पानशेत : 7.56 TMC 71% भरले  

- वरसगाव : 8.47 TMC 66% भरले

- टेमघर : 1.81 TMC 49% भरले

खडकवासला धरणात सध्या 8,851 क्यूसेक आवक सुरू आहे. पाण्याची आवक विसर्गापेक्षा जास्त असल्याने जलपातळी वाढत आहे. पर्जन्यमान वाढल्यास लवकरच सांडव्यावरून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

चासकमान धरण 

चासकमान धरण 94.29% भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणात मोठी आवक आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 9:00 वाजता भीमा नदीत 3500 क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

मुळशी धरण

मुळशी धरण 82% भरले आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी 1000 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग दुपारी 12:00 वाजता 5000 क्यूसेक करण्यात येणार आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात आणखी बदल होऊ शकतो.

नागरिकांसाठी सूचना

जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

- कोणीही नदीपात्रात उतरू नये

- नदीतील पंप, शेती अवजारे, वाहने आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत

- सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे

सध्या धरणांमध्ये पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने पुढील 24 ते 48 तासात विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.