दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : सध्या देशाचे राजकारण दिल्लीमध्ये एकवटले आहे. देशाचे अनेक नेते हे दिल्लीमध्ये आहेत. त्याचबरोबर एकीकडे संसद भवनामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर दुसरीकडे 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने जंतर-मंतरवर वातावरण तापवले आहे. जंतर-मंतरवर विरोधी पक्ष नेते आणि विविध सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले आहेत. तर अभिनेत्यांनी देखील या आंदोलनात आपला सहभाग दर्शविला आहे. दरम्यान, आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

भेटीमध्ये विशेष करून कोणते मुद्दे चर्चेत होते?

मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीमध्ये विशेष करून NEET परीक्षा, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या हा प्रमुख विषय चर्चेचा होता.  

त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या या समस्यांबाबत आणि NEET पेपरफुटी प्रकरणी नेमक्या काय उपाययोजना करता येतील, याबत चर्चा झाली असल्याचे म्हटले जात आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवार यांचे स्वागत केले आणि त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत सरकारच्या भूमिकेबद्दलही चर्चा झाल्याचे समजते.

नेमकी या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. लवकरच शरद पवार हे प्रसार माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे समजते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे जंतर-मंतरवर जाऊन त्यांनी 'अभिजीत दिपके', कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक यांची भेट घेतल्याचे देखील समजते. यावेळी या आंदोलनादरम्यान कोणत्याही स्वरूपाची मदत हवी आहे का, असे शरद पवार यांनी विचारले असता, सध्या कोणत्याही प्रकारची मदत घेण्यास अभिजीत दिपके यांनी असमर्थता दर्शविल्याचे समजते.