शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी : कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर होणार? नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील बळीराजासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेच्या अंमलबजावणीची वाट पाहत होते. मात्र आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?

गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा सुरू आहे. या प्रक्रियेला काही काळ लागू शकतो, अशी माहिती सरकारने यापूर्वी दिली होती. 

दरम्यान आता पहिली यादी उद्या जाहीर होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भातील आवश्यक तयारी पूर्ण झाली असून संबंधित यंत्रणा अंतिम टप्प्यातील कामात व्यस्त आहे."

एकीकडे राज्यात पावसाने जोर धरल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे आणि कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.