आंदोलन पेटलं ! कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांचा लाठी चार्ज - टॉप न्यूज मराठी

दिल्ली : आज दिल्लीतील Delhi वातावरण प्रचंड तापलेल आहे. सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान Union Education Minister Dharmendra Pradhan यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण अजूनही सुरू आहे. त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने CJP आपले आंदोलन सुरू ठेवले असून आज संसदेवर मोर्चा काढण्याची हाक देण्यात आली आहे. 

एकीकडे संसदेवर मोर्चा काढण्यासाठी हे विद्यार्थी संसदेच्या दिशेने कूच करत आहेत. तर संसदेत पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होते आहे. दरम्यान दिल्लीमध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा या कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन थोपवण्यासाठी लाठी चार्ज करण्याचा देखील मार्ग अवलंबला जातो आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीच्या या मोर्चामध्ये इतर विरोधी पक्षाचे देखील नेते सहभागी झाले आहेत. दरम्यान मेट्रो स्टेशन एन्ट्री आणि एक्झिट बंद करण्यात आली आहे. इंटरनेट जॅमर देखील लावण्यात आले आहेत. दरम्यान जंतर-मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज देखील केला आहे. त्यामुळे एकंदरीतच हे वातावरण चिघळतानाच दिसते आहे.