"समाजवादी चळवळीचा तेज हरपलं !" डॉ. कुमार सप्तर्षी यांना पुण्यात अखेरचा निरोप, सोमवारी अंत्यसंस्कार - टॉप न्यूज मराठी

पुणे: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे स्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी पुण्यात ८५व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

डॉ. सप्तर्षींनी युवकांमध्ये सामाजिक परिवर्तनाची जाणीव निर्माण करण्याचं मोठं कार्य केलं. त्यांनी अन्याय, विषमता आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. लेखक, विचारवंत, प्रभावी वक्ते आणि माजी आमदार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत."

डॉ. कुमार सप्तर्षींवर सोमवारी 20 जुलै 2026 रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव कोथरूड येथील गांधी स्मारक निधीमध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत सर्वसामान्यांसाठी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे, त्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.