तुम्हीही उपवासाला साबुदाणा, रताळी, बटाटे,शेंगदाणे खाऊन उपवास करता का ? काय खावं काय खाऊ नये ? नेमका उपवासाचा अर्थ काय जाणून घ्या ! - टॉप न्यूज मराठी

उपवास म्हटले कि आपल्याकडे खिचडी ,दही ,वेफर्स ,अश्या काहीतरी पदार्थ खाऊन करायचा असतो ,असा काहीतरी गैरसमज आहे. अनेक लोकांना आम्ही 

उपवास म्हणजे काय ? तो कश्यासाठी धरायचा असतो ? उपवासाच्या दिवशी खिचडी ,बटाटाच का चालते, इतर पदार्थ का चालत नाही ? यातील एकाही प्रश्नाचे उत्तर माहित नाही. काहींनी तर खिचडी आवडते म्हणून उपवास धरतात. सगळे धरतात ,सगळे खातात म्हणून आम्ही पण खातो. देवाला प्रसन्न करण्यासाठी ,धर्म जपण्यासाठी अस तुम्हालाही वाटत का ? 

कोणतीही गोष्ट डोळस पणे विशेषतः आहाराच्या बाबतीत आपण पाळत नाही त्याचा परिणाम म्हणून आजार होतात .

साबुदाणा ,बटाटा ,तळलेला पदार्थ ,दही पचायला जड असतात लोकांना हेच माहीत नसते ,कोणताही उपवास झाल्यावर पोट जड झाले आहे , गॅसेस होतात , पोट गच्च होते ,ऍसिडिटी वाढली अशी अनेक तक्रारी घेऊन लोक येतात. तसेच काही निरंकार उपवास करणारे आहेत म्हणजे काहीच खात नाहीत. अचानक तुम्ही उपाशी राहिल्यास वात व पित्त दोन्ही वाढते व ऍसिडिटी , गॅसेस , पोट साफ न होणे या तक्रारी वाढतात व शरीराचे पोषण होत नाही. 

उपवास यांचा अर्थ हलका व मित आहार घेणे असा होतो. उपवासामुळे शरीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो. म्हणून खरंतर उपवास करावा .

उपवासाला काय खायचे ?  

१ गरम पाणी प्यावे : कमी करण्यासाठी छान काम करते.

२ मध : पाचन करत.( उष्णतेचा पित्ताचा त्रास असणाऱ्यानी घेऊ नये )

३ ताक : स्वभावता: रुक्ष आहे. त्यामुळे ते वात आणि कफाला परिणामी आमाला कमी करते. ज्यांना ताकाचा त्रास होतो त्यांनी धने ,जिरे ,सेंधव, हिंग ,खडीसाखर घालून घ्यावे. ( उष्णतेचा पित्ताचा त्रास असणाऱ्यानी घेऊ नये )

४ राजगिरा लाडू : पचायाला हलका, ऊर्जा देणारा, बलवर्धक

५  दूध : गरम गरम सुंठ, वेलची पावडर, जायफळ,खडीसाखर  घातलेले दुध पचायला हलके होते.

६.तुप :  उत्तम अग्निवर्धक बलवर्धक पित्तशामक पचन सुधाणारे आहे.

७.वरिईच तांदूळ: भाजून वापरावे. भाजलेले वरिच तांदूळ पचायला हलके असते.

८.भाजलेल्या किंवा फुलवलेले अन्न : लाह्या पचायला हलके असते आतड्यांना चिकटलेला आम ( न पचलेले अन्न ) सोडवण्यात मदत होते.

९. फळां मधे : काळे मनुके .खजूर ,अंजीर  ,डाळिंब, 

१०.राजगिरा : लाडु , भाकरी , भाजी.