दिल्ली : जंतर-मंतरवर सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण सुरू आहे. आज सकाळी आठच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते सोनं वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असा थेट दावा केला आहे.
सोनम वांगचुक यांचे आंदोलन वीस दिवस झाले सुरूच आहे. आज 21 वा दिवस त्यांची प्रकृती खालावली आहे. पाण्याची पातळी शरीरातील कमी झाली आहे. तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. 21 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचे देखील नियोजन होते. पण तत्पूर्वीच आज जबरदस्तीने सोनं वांगचुक यांना जंतर-मंतर या उपोषण स्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल करण्यात आल.
यावर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील राजीनामा हवा अशी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, " पोलिसांकडून आमचे आंदोलन चिरडण्याचे काम केले जाते आहे. पण आमचे आंदोलन संपणार नाही. ते चालूच असेल. आता आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही राजीनामा हवा अशी भूमिका अभिजीत दिपके यांनी घेतली आहे. दरम्यान नुकताच एक धक्कादायक प्रकार देखील समोर आला. अभिजीत दिपके यांचे भाषण सुरू असतानाच एक महिला त्यांच्याजवळ आली आणि या महिलेने दिपके यांच्यावर शाइ फेक केल्याचा प्रकार घडला आहे. एकंदरीतच जंतर-मंतरवरील वातावरण हे सातत्याने चिघळतेच आहे.