मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण आता प्रचंड गूढ झाले आहे. पहाटेच्या शपथविधीपासून आता शरद पवार राष्ट्रवादी गट एनडीए मध्ये सामील होऊ शकतो, या चर्चेपर्यंत सर्वकाही महाराष्ट्राच्या जनतेला धक्का देणारा आहे. एकीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDA मध्ये सामील होणार ही चर्चा वेग घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड एक तासभर चर्चा झाली. त्यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा पक्षाच्या काही कामकाजाविषयी त्यांनी भेट घेतली होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आधीच तिथे उपस्थित होते असं त्यांनी सांगितलं. दरम्यान आता जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सुमारे तासभर या दोघांमध्ये चर्चा झाली अशी माहिती मिळते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी नंदनवन या शासकीय निवासस्थानी जयंत पाटील पोहोचले. त्यांच्याबरोबर यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीनंतर जर शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये सामील झाला तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात जयंत पाटील यांना अर्थ खात मिळण्याची दाट शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, " ते लोक रामदास आठवले यांना भेटले तर तुम्ही त्यांना आठवले यांच्या पक्षात जाणार असे म्हणणार का ? महाराष्ट्र आणि देशात इतके राजकीय पक्ष बनले आहेत की कोणी ना कोणी एकमेकांना भेटत असतात. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे सर्व पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत असतात. ते फ्री बर्ड्स आहेत. त्यांना भेटू द्या असं..!" खोचक वक्तव्य त्यांनी केल आहे.