कोल्हापुरात खळबळ ! भाजप कार्यकर्त्यावर सावकारीतून गोळीबार, नेमकं प्रकरण काय ? - टॉप न्यूज मराठी

कोल्हापूर : कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येते आहे. कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते सुरज साखरे यांच्यावर गोळीबार झाला आहे . यामध्ये सुरज हे जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही वेळापूर्वी नवीन वाशी नाका परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये भाजप कार्यकर्ते सुरज साखरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. दोघाजणांनी हा गोळीबार केला. सध्या सुरज साखरे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू झाला आहे. 

बातमी उपडेट होते आहे ...