राऊत कौटुंबिक वाद चिघळला ! विनायक राऊत म्हणाले, " बोलण्यासारखे काहीही नाही, मुख्यमंत्र्यांना भेटणार!" - टॉप न्यूज मराठी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विनायक राऊत यांचा कौटुंबिक वाद प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या वादामध्ये आता राजकीय हस्तक्षेप देखील एकीकडे सुरू झाले आहेत.  दरम्यान काही दिवसांपूर्वी विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत या मुख्यमंत्र्यांना भेटणार असं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान आता स्वतः विनायक राऊत हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं प्रकरण काय 

 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या घरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. हे वाद आहेत त्यांची सून गिरीजा राऊत आणि मुलगा गीतेश राऊत यांच्या खाजगी आयुष्यातले. परंतु हे प्रकरण आता तितकसं खाजगी राहिलेलं नाही. गिरीजा राऊत यांनी राऊत कुटुंबावर मानसिक छळ आणि जादूटोणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली असून अँटीसिपेटरी बेल प्रकरणी 23 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे.

राऊत यांच्या कुटुंबावर आणि मुलगा गितेश राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. या आरोपांबाबत गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवरून पडदा उघडला. परंतु याबाबत विनायक राऊत यांनी काहीही बोलण्यास समर्थता न दर्शविता ते म्हणाले आहेत की, " या विषयात बोलण्यासारखे काहीही नाही. अँटीसिपेटरी बेल प्रकरण अद्यापही कोर्टात पेंडिंग आहे. त्याची सुनावणी 23 तारखेला आहे. आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास आहे पोलीस यंत्रणेवर आणि न्यायालयावर, जाणीवपूर्वक पॉलिटिकल ड्रामेबाजी केली जात असेल तर ठीक आहे. सध्या याच्यावर मला काही बोलायचे नाही. मी 23 तारखे नंतर बोलणार आहे. आज मी तुम्हाला काही सांगत नाही. 23 तारखे नंतरच सांगेल. मुख्यमंत्री आमचेही आहेत! " अशा भाषेत विनायक राऊत यांनी या प्रकरणावर 23 तारखेपर्यंत पडदा टाकण्याचे प्रयत्न केले आहेत. 

एकंदरीतच आता न्यायालयामध्ये 23 तारखेला नेमके काय घडते ? या प्रकरणावर विनायक राऊत नेमके काय म्हणतात ? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये नेमका कसा हस्तक्षेप करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.