मानसिक आरोग्य : तुम्हाला अंदाज असेल जर पोट, डोकं दुखत असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. काम सुचत नाही, राग येतो. जसा शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी असणं गरजेचं आहे तसंच मानसिक आरोग्यासाठी तुमचं मन निरोगी असणं खूप आवश्यक आहे. मानसिक आरोग्यासाठी सर्वात रामबाण औषध आहे तुमचं मनातून खळखळून हसणं. अर्थात माणूस उगच हसत नाही. त्यासाठी काहीतरी प्रसंग घडावा लागतो. आतून आनंद मिळण्यासाठी काहीतरी सुखकारक घटना घडावी लागते यात शंका नाही पण काही अशा टिप्स देते ज्यामुळे तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी खळखळून हसता येईल.
-तणावमुक्ती हसताना मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स आणि डोपामिन नावाचे आनंददायक हार्मोन्स स्रवतात, जे तणाव कमी करतात.
-रक्तदाब नियंत्रणात ठेवतो नियमित हसण्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतो व हृदय निरोगी राहते.
-इम्युनिटी वाढते हसल्याने शरीरातले सक्रिय होतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
-श्वसनसंस्थेचा व्यायाम होतो मोठ्याने आणि मनापासून हसल्यास फुफ्फुसांचा व्यायाम होतो, त्यामुळे श्वास घेण्याची क्षमता वाढते.
-वेदनाशामक प्रभाव हसण्यामुळे नैसर्गिक पेन-किलर्स मेंदूमध्ये तयार होतात. त्यामुळे वेदना कमी जाणवतात.
-पचन सुधारते हसल्याने पोटाचे स्नायू हालतात, ज्यामुळे पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो.
-सकारात्मक विचारसरणी निर्माण होते मनात आशावाद आणि आनंददायी विचार वाढतात. नैराश्य दूर ठेवण्यास मदत होते.
-चेहरा तेजस्वी व तरुण राहतो हसल्याने चेहऱ्याचे स्नायू हलतात, त्वचेची झीज कमी होते आणि त्वचेला नैसर्गिक तेज येते.
-झोप सुधारते हसल्यामुळे मन शांत होते आणि गुडी नाइट स्लीप मिळते.
-नातेसंबंध दृढ होतात.हसणं म्हणजे सकारात्मक ऊर्जा. हसतमुख व्यक्तींशी लोक जास्त जोडले जातात.
संवाद कौशल्य सुधारते: विनोद व हास्य संवाद अधिक सहज करतात.
सर्जनशीलता वाढते: हसणारे मन अधिक खुलं आणि क्रिएटिव्ह असतं.
ध्यानात मदत : हास्य ध्यान हा एक वेगळाच अनुभव आहे. शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होतात.
वैज्ञानिक आधार
हसताना मेंदूतील limbic system सक्रिय होते – जे भावना नियंत्रित करतो. Cortisol (तणाव निर्माण करणारा हार्मोन) कमी होतो.
1. सकाळी हसून दिवसाची सुरुवात करा : आता हसून दिवसाची सुरुवात करा याचा अर्थ झोपेतून उठले की खदाखदा हसायला लागा असा नाही. पण बऱ्याच वेळा जेव्हा आपण झोपेतून जागे होतो त्यावेळेस मेंदू आपल्या वास्तव जीवनातील चांगल्या- वाईट घटना रेकॉल करून देत असतो. अशावेळी काय करायचं जेव्हा वाईट,आठवणी घडलेला वाईट प्रसंग मेंदू आठवण करून द्यायला लागतो त्यावेळेस मेंदूच्या या विचारांवर नियंत्रण आणायला शिका. आजचा दिवस छान जाणार आहे. त्यासाठी मी सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करत आहे असं म्हणून चेहऱ्यावर स्मित आणून दिवसाची सुरुवात करा.
2. कॉमेडी चित्रपट, सिरियल्स बघा : टीव्ही चॅनल्सवर, रिल्स किंवा कोणतेही कॉमेडी चित्रपट आवर्जून पहा. अगदी मेंदू बाजूला ठेवून असे चित्रपट बघा आणि खळखळून हसा.
3. मित्र-परिवारासोबत गप्पा मारा आणि जुने विनोदी किस्से आठवा. मनावर जेव्हा दुःखद घटना यांचा बोजा असतो तेव्हा मित्र आणि कुटुंबासोबत मनमोकळ्या गप्पा मारा. चांगल्या आठवणी आठवा. जे वाईट घडलं आहे त्यावर लवकरात लवकर माती टाकायला शिका आणि जर जमत नसेल तर अति विचार करणे टाळा.
4. हास्य योग करा.
5. दिवसभरातील एक विनोदी क्षण मनात आठवा आणि मनापासून हसा.