पाकिस्तान : आता झालेल्या मोठ्या बातमीनुसार बलुचिस्तान ने स्वतःला पाकिस्तानपासून वेगळे होऊन स्वतंत्र देश असल्याचे घोषित केले आहे मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून बलुचिस्तान स्वतःला स्वतंत्र देश असल्याचं घोषित करून रिपब्लिकन ऑफ बलुचिस्तान या नावाने एक अधिकृत पत्र सोशल मीडियावर प्रसारित केले आहे.
दरम्यान बलुचिस्तानच्या लष्करानं 85 टक्के भागावर ताबा मिळवून आता स्वतःचा नवा राष्ट्रध्वज राष्ट्रगीत नवीन चलन आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था लागू केल्याचं म्हटलं आहे यामुळे बलुचिस्तान मध्ये असलेले गॅस प्रकल्प खनिज साठे आणि कोळशाच्या खाणींवर आता पाकिस्तानचा अधिकार राहणार नाही एवढेच नाही तर पाकिस्तान मध्ये सुरक्षा यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या बलुचिस्तानच्या नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने राजीनामे देऊन या स्वातंत्र्य लढ्याला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
पाकिस्तान मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आहे. त्याचबरोबर अंतर्गत राजकारण वादविवाद यामुळे आता पाकिस्तानी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.