खरं पाहायला गेलं तर आजकाल आपण विशेष करून काचेच्या लीफ्ट जास्त पाहतो. अगदी निवासस्थान म्हणा तर विशेष करून ऑफिस, मॉल, मोठे हॉस्पिटल्स, एअरपोर्ट अशा अनेक ठिकाणी काचेच्या लिफ्टचा वापर केला जातो. जर ही गोष्ट कधी तुम्ही नोटीस केली नसेल तर यामागे एक महत्त्वाचे शास्त्रीय कारण आहे बर का ! तर नेमकं काय जाणून घेऊया.
तुम्ही आजपर्यंत अनेकांकडून ऐकलं असेल की त्यांना लिफ्टमध्ये जाण्याचा अगदी दोन-तीन मजले वर खाली जाण्याची देखील भीती वाटते. याला एलिव्हेटर फोबिया किंवा क्लिस्ट्रोफोबिया असं म्हटलं जातं. अशी अनेक उदाहरणं देखील आहेत ज्यामध्ये लिफ्टमध्ये अडकलं जाणं यामुळे मनात बसलेली भीती म्हणून देखील अनेक जण पायऱ्या चढून किंवा उतरून जाणं पसंत करतात , पण लिफ्टमध्ये जात नाहीत. याला हेच एलिव्हेटर फोबिया कारण आहे. याला आणखीन एक महत्त्वाचं शास्त्रीय कारण असे समजले जाते की सामान्यतः आधी लिफ्ट या चारही बाजूने बंदिस्त असायच्या. त्यामुळे एका छोट्याशा खोलीमध्ये अडकल्यासारखे काही जणांना वाटते. आणि त्यामुळे दडपण येते. काचेच्या लिफ्टमध्ये लोक बाहेरच जग सहज पाहू शकतात. त्यामुळे ही भीती मोठ्या प्रमाणावर कमी होते.
दुसरं महत्त्वाचं कारण हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आहे. जर लिफ्ट तांत्रिक कारणाने बंद पडलीच तर आतील परिस्थिती काय आहे ? हे लवकर समजू शकते.
काचेच्या लिफ्ट दिसायला देखील सुंदर दिसतात. हे देखील एक सामान्य कारण आहे.
एकंदरीतच मूळ कारण एवढेच म्हणू शकतो की प्रत्येकच वेळी दृष्टी आड सृष्टी ही म्हण बरोबर नाही. कधी कधी सृष्टी समोर दिसल्यामुळे म्हणजेच आजूबाजूचे जग जे मानवी नजरेला सामान्य असतं ते दिसत राहील की माणसाच्या मनावरचा दडपण कमी होऊ शकते. याला सायकॉलॉजिकल फॅक्टहि आपण म्हणू शकतो.