झारखंड : सध्या भारतामध्ये प्रेम संबंधातून हत्या अशी प्रकरण प्रचंड प्रमाणात वाढली आहेत. पुण्यामधील सिया गोयलने आपल्या भावी पतीची केतन अग्रवाल यांची निर्दयीपणे हत्या केली. हे प्रकरण अद्याप थंड झाले नाही,तर एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. झारखंड मधील या तरुणीने आपल्या भावी पतीला संपवून त्याचा मृत्यदेह जंगलात फेकण्याचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या गिरीदिह जिल्ह्यातील जमवा पोलीस स्टेशन हद्दीतील हे प्रकरण आहे. यामध्ये निरज हजरा या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 21 वर्षीय नीरज हजरा हे 5 जुलैला घरी उशिरा परत झाले नाही. दरम्यान घरच्यांनी त्यांची मीसिंग कंप्लेंट पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये निरज हजरा यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांचा मृतदेह एका जंगलामध्ये आढळून आला आहे.
गमतरीया या गावातील उर्मिला कुमारी हिचा विवाह निरज हजरा यांच्याशी ठरला होता. परंतु या तरुणीचे प्रेम संबंध तिच्याच बहिणीच्या नवऱ्यासोबत होते. दरम्यान घरच्यांनी तिचं जबरदस्तीने मिरज याच्यासोबत लग्न ठरवले. या दोघांच्या लग्नासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक असताना तिने तिच्या बहिणीच्या पतीसोबत निरजची हत्या केली आहे. या दोघांनी मिळून निरज याची हत्या करून त्याचा मृतदेह बिहारच्या जंगलात फेकून दिला होता.
पोलिसांना निरज यांची मिसिंग कंप्लेंट दाखल झाल्यानंतर मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते या जंगलामध्ये येऊन पोहोचले. या जंगलात पोलिसांना काही दिवसांपूर्वी मृतदेह सापडला होता. त्याचा तपास सुरू होता. तपासांती हा मृतदेह नीरज याचाच असल्याचं उघड झाल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.