मुंबई : सध्या विनायक राऊत यांच्या कौटुंबिक वादाने महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे. विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. यामध्ये गिरीजा राऊत यांनी कुटुंबाकडून मानसिक छळ केला गेला असल्याचं म्हटल्यानंतर यावर विनायक राऊत यांनी फारसं बोलणं टाळलं असलं तरी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे असं त्यांनी म्हटले आहे.
गिरजा राऊत या विनायक राऊत यांच्या सून गितेश राऊत यांच्या पत्नी आहेत. त्यांनी कुटुंबावर मानसिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, "या आरोपामागे षडयंत्र आहे. त्याचा सूत्रधार कोण आहे याचे पुरावे मी आज देणार नाही. परंतु माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे." एवढेच ते म्हणाले आहेत.
या राऊत कुटुंब वादामध्ये आता करुणा मुंडे यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "पुढारी तांत्रिक, मांत्रिकाच्या नादी लागलेले असतात. त्यांच्या सुनेला न्याय भेटला पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. विनायक राऊत यांनी म्हटलं की, " तिने पैशांची मागणी केली, परंतु तुम्ही त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. श्रीमंत लोकांना काय वाटतं? की महिलांचं आयुष्य फक्त असच असतं? काय विचार करून तुम्ही लग्न करता? आज मंत्रिमंडळामध्ये बसलेल्या एका एका आमदार, खासदारांना दोन -दोन तीन-तीन बायका आहेत, पण त्यावर कोणी बोलणार नाही. महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे, तिथे कोणीतरी बसवा, नाहीतर मला महिला आयोगाचे अध्यक्ष करा, मग मी बघा महिलांना कसा न्याय देते ते असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. पुढाऱ्यांमध्ये अंधश्रद्धा असते, एक खासदार, आमदार, नगरसेवक असा नाहीये, ज्याचा संबंध हा भोंदू बाबासोबत नाही. विनायक राऊत यांच्या सूनेला मी भेटणार आहे." असंही यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या.
एकीकडे या प्रकरणी विनायक राऊत न्यायदेवतेवर विश्वास आहे असं म्हणत असले तरी त्यांच्या कुटुंबावर सुनेकडून आणि त्यांच्या घरच्यांकडून मोठे आरोप होत आहे. गिरीजा राऊत यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही राऊत त्यांच्या अटकेची मागणी करत आहोत. हे प्रकरण सामोपचाराने मिटवलं जाव यासाठी बोलत होतो. शारीरिक संबंध होणार नाही तर मुलं होणार कशी? आम्ही म्हणायचं डॉक्टरांकडे जाऊन उपचार करू. पण राऊंतांनी अंधश्रद्धा केली." अस खळबळ जनक वक्तव्य गिरिजा राऊत यांच्या आईने केले आहे. एकंदरीतच हे प्रकरण सातत्याने चिघळते आहे.