मुंबई : मुंबईतील हॉटेल ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन नियंत्रण कक्षाला आला होता. शनिवारी हा फोन नियंत्रण कक्षाला आल्यानंतर पोलीस दल आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने संपूर्ण हॉटेल पिंजून काढले. परंतु कोणताही धोका नसल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान कुलाबा पोलीस सतर्क आहेत. धक्कादायक म्हणजे हा फोन गँगस्टर दाऊदच्या नावाने करण्यात आला होता.
पोलीस पथकाने संपूर्णपणे हॉटेलची झाडाझडती घेतली आहे. दरम्यान तांत्रिक तपासामध्ये हा धमकीचा फोन मुंबईच्या तुर्भे परिसरातून आल्याचं उघडकीस आलं आहे. मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. हा धमकीचा फोन नेमका कोणी आणि का केला याचा तपास विशेष पथक करत आहे.