मेष रास :
आजचा दिवस तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात नवीन आव्हान घेऊन येणारा असू शकतो. तुमच्या कौशल्यावर तुम्ही आजचा दिवस छान पेलवणार आहात. त्यामुळे वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल.आरोग्य छानआहे . कौटुंबिक वातावरण शांत राहील एकंदरीत दिवस सुखाचा !
वृषभ रास :
वृषभ राशीसाठी आज कार्यक्षेत्रामध्ये दिवस सामान्य आहे, नेहमीचे रुटीन फॉलो कराल. नातेसंबंधांमध्ये स्थिरता आहे. परंतु पोटाच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे खानपान संभाळा बाकी दिवस उत्तम !
मिथुन रास
मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. कार्यक्षेत्रामध्ये दिवस सामान्य असला तरी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी विनाकारण हुज्जत घालू नका. आज तुम्हाला वाणीवर संयम ठेवण आवश्यक आहे. दिवस सामान्य राहील.
कर्क रास
कर्क राशीसाठी कार्यक्षेत्रामध्ये आजचा दिवस सामान्य आहे. जोडीदारासोबत आज विशेष वेळ घालवण्यासाठी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. वातावरणाचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. परंतु मन प्रफुल्लित असल्यामुळे दिवस उत्तम साजरा कराल !
सिंह रास
सिंह राशीनी अद्यापही वाणीवर आणि मनातील अति विचारांवर संयम आणायला हवाच ! सध्या सिंह राशीने केवळ संयम हाच मंत्र जप करायचा आहे. ज्यामुळे नातेसंबंध आणि कार्यक्षेत्रामध्ये वातावरण नियंत्रणात राहू शकेल. तब्येतीच्या कुरबुरी जाणवतील, तरीही दिवस सामान्यच आहे. काळजी नको.
कन्या रास
कन्या राशीसाठी आज दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रामध्ये कामाशी काम ठेवा. कोणाच्या कामात चुका काढायला जाऊ नका. घरामध्ये एखादे मंगल कार्य ठरू शकते. सुट्टी काढून मंगल कार्याचा आनंद घ्या. पंचपकवांनांचा आस्वाद घेणारा आहात, पोट सांभाळा. बाकी दिवस उत्तम !
तुळ रास
तूळ राशीसाठी आजचा दिवस छान जाणार आहे. कार्यक्षेत्रात आव्हान येऊ शकतात. पण ते तुमच्यासाठी फार जोखीम असणारे नाहीत. हुशार आहात. पेलवून न्याल. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण असेल. घरात काहीतरी कार्यक्रम ठरेल, किंवा ट्रीपला जाण्याचा प्लॅन कराल. डोकेदुखी, सर्दी असे त्रास जाणवू शकतात. परंतु दिवस उत्तम !
वृश्चिक रास
आव्हान आहे पण त्यात संकट नाही ! पाठ फिरवू नका सामना करा. आयटी क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रामध्ये प्रमोशनचे योग आहेत. पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे खान पानावर नियंत्रण आणा. तब्येत सांभाळा. बाकी दिवस छान !
धनु राशि
धनु राशीला आज नशिबाची साथ मिळेल. परंतु वाणीवर संयम ठेवा. ज्या ठिकाणी शब्दांना आणि तुमच्या असण्याला मान आहे अशाच ठिकाणी उपस्थित रहा. आणि सल्ला द्या ऑफिसच्या रोजच्या धकाधकीतून सुट्टी काढून जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करा. तुम्हाला निवांत विश्रांतीची गरज आहे. मन कुठेतरी दमल्यासारखे वाटते आहे.
मकर राशि
कामाचा मोठा ताण जाणवणार आहे. जोडीदाराच्या शोधात असाल तर आज ती व्यक्ती भेटण्याची दाट शक्यता आहे. मन शांत आणि प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न करा. अति विचार करणे टाळायलाच हव. वाणीवर संयम ठेवा. कमी बोलल्याने अनेक संकटे आपोआप मिटतात. विद्यार्थ्यांसाठी देखील आज नवीन काही शिकण्याची सुरुवात करणार असाल तर चांगला दिवस आहे.
कुंभ रास
कुंभ राशीसाठी आजचा दिवस आरोग्याच्या काही किरकोळ समस्या सोडल्या तर उत्तम जाणार आहे. संकट समोर आहेत. साडेसाती सुरूच आहे. पण आता आव्हान पेलण्याची ताकद शनि महाराजांनी दिली आहे. सामना करा. दिवस हळूहळू बदलत आहेत. सुख समोरच आहे !
मीन रास
मीन राशीसाठी आजचा दिवस हलकाफुलका आहे. मित्र-मैत्रिणी जोडीदार कुटुंबासोबत छान वेळ व्यतीत कराल. ट्रीपला जाण्याचा बेत आखाल. मन प्रफुल्लित आहे. कार्यक्षेत्रामध्ये देखील स्थिरता आहे. आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा आनंद घ्या वर्तमानात जगा.
राशींवरून केलेला भविष्याचा अंदाज नेहमी मार्गदर्शन समजून घ्यावा ! आपले सत्कर्म, ,प्रामाणिक मेहेनत नेहमी चांगले भविष्य निर्माण करते.