पुणे ग्रामीण डाक विभागातील काही निवडक शाखाडाकघरांच्या कामकाजाचा आढावा - टॉप न्यूज मराठी

११ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्रातील पिंपळे सौदागर येथे श्री. रामचंद्र जायभाये, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल यांचेमार्फत 

पुणे ग्रामीण डाक विभागातील काही निवडक शाखा डाकघरांच्या कामकाजाचा आढावा व शाखा डाकपाल यांचे सोबत संवाद साधण्यात आला.

कामाच्या आढाव्यासोबत रजिस्टर /स्पीड पोस्ट पंजीकरण, बचत खाते संपादन आणि

 विमा पॉलिसी इत्यादी बाबत शाखा डाकघरांकडून असलेल्या अपेक्षा व सहभाग याबाबत मंथन करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये ग्रामीण डाक सेवकांच्याशी संवाद साधताना, काही ग्रामीण डाक सेवकांनी त्यांचे अनुभव / मते सादर केली. 

या कार्यक्रमासाठी पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती प्रीती अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले तसेच 

श्री. अभिजित बनसोडे, संचालक, पुणे डाक क्षेत्र यांनी सविस्तर आढावा घेत उद्दिष्टपूर्तीची सद्यस्थिती सर्वांना अवगत केली. 

सदर संमेलनासाठी क्षेत्रीय कार्यालय पुणे व पुणे ग्रामीण डाक विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.