महाराष्ट्र : एक जुलैपासून महाराष्ट्रामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं. आठ दिवस धो-धो पाऊस पडला. नदी नाले धरण सगळं काही तुडुंब भरून वाहत आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा उन्हाचा आणि सावलीचा लपंडाव सुरू झालाय. वातावरणात पुन्हा उष्णता जाणवत असली तरी पाऊस पुन्हा येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आठ जुलै पर्यंत धो धो पाऊस कोसळला. आवश्यक धरणे, जलाशय, भरली आहेत. अति मुसळधार पावसामुळे जीवितहानी, वित्तहानी घडली असली तरी पाऊस देखील महत्त्वाचा आहे. पण अचानक पावसानं दडी मारली. गेली तीन ते चार दिवस अत्यंत तुरळक पाऊस होतो आहे. विशेष करून ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. तर तापमान देखील 32 अंश सेल्सिअस झाल्याचे नोंदवण्यात आले आहे असे असले तरीही भारतीय हवामान विभागाकडून 18 राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा वर्तवला असून वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.