पुणे : मावळ तालुक्यातील दुधाविरे खिंडीमध्ये सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरु असल्याने नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या विचार करता खिंडीमधील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.
मुंबईकडून पवनानगर येथे येणारी सर्व वाहतूक लोणावळा- कुमार चौक भुशी धरण-घुसळखांब- जवण मार्ग मुळशी- पवनानगर अशी वळवण्यात अली आहे. तसेच पुणे शहराकडील पवनानगर येथे येणारे पर्यटकांची व स्थानिक रहिवाशी यांची संपुर्ण वाहतुक लोणावळा येथे जाण्याकरिता पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ सोमाटणे फाटा- कडधे-पवना धरण
-कामशेत खडाकळे-काळे कॉलनी- पवना धरण
-चांदणी चौक- पौड फाटा-काशिंग-जवण- पवनानगर
अशा प्रकारे वळविण्यात आली असून नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा,असे आवाहन प्रशासनाच्या करण्यात येत आहे.