धक्कादायक : नाशिकमधील आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म ! - टॉप न्यूज मराठी

नाशिक : नाशिकमधील कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील एका आश्रम शाळेमध्ये अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे.  या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी येथे आदिवासी निवासी आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने नुकताच एका बाळाला जन्म दिला. या घटनेनंतर पोलीस तपासामध्ये या अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातीलच एका मुलान अत्याचार केल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला गुन्हा दाखल करून बाल सुधार गृहात पाठवले असल्याचे समजत आहे. 

दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित केला जातो आहे. मिळालेल्या माहितीनुसार आश्रम शाळेमध्ये विद्यार्थिनींची नियमित तपासणी होते असं होत असताना मुलीच्या गर्भावस्थेची माहिती कशी मिळाली नाही? हे प्रकरण का लपवले गेले? याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींना कडक शासन करावे अशी मागणी शासन स्तरावर होत असतानाच आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी देखील अंतर्गत सखोल तपास सुरू केल्याचं म्हटलं आहे.