जयपुर : जयपुरमध्ये हृदय पिवळटून टाकणारी घटना घडली आहे. एका सरकारी नोकरीसाठी आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या करणाऱ्या मुलीला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. या कटकारस्थानामध्ये निरज शर्मा या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निरज शर्मा यांचे पती कोर्टात एलडीसी या पदावर कार्यरत होते. वर्षभरापूर्वीच पतीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर निरज शर्मा यांना पतीच्या जागी सरकारी नोकरी मिळाली होती. दरम्यान आयुषी वय 24 वर्षे ही त्यांची मुलगी त्यांना नोकरी आणि मालमत्तेसाठी सातत्याने त्रास देत होती. दरम्यान त्यांच्या मुलीने काका मोहन आणि काकांचा मुलगा बलराम यांच्यासह मिळून हेमंत नामक व्यक्तीला आईला मारण्यासाठी सात लाख रुपयांची सुपारी दिली. या कटामध्ये हेमंत यासह आकाश,अरविंद, रोहित आणि मोहित हे देखील सहभागी झाले होते. दरम्यान चार जुलै रोजी जयपुरमध्ये अपघातामध्ये मिरज शर्मा यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. परंतु भावाने व्यक्त केलेल्या क्षमतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.
दरम्यान आई नीरज शर्मा हिचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आयुषीन तिचे मामा राकेश कुमार शर्मा यांना सांगितली. राकेश यांना मात्र आयुषीवर संशय होता. त्यांनी थेट पोलिसात जाऊन याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की आयुषी आणि दीर यांच्याबाबत निरजने बराच वेळा तक्रार केली होती. घराचे लोक मालमत्तेसाठी त्रास देत आहेत. दरम्यान पोलिसांनी अधिक तपास केला असता या कटामध्ये मुलीचाच हात असल्याचा उघडकीस आला आहे.