भयानक..! अमेरिकेत पत्नीची हत्या; भारतात प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो, असा अडकला अमेरिकी पोलिसांच्या जाळ्यात - टॉप न्यूज मराठी

अमेरिका : अमेरिकेतून एका भारतीय वंशाच्या सॉफ्टवेअर इंजिनियर बाबत धक्कादायक माहिती समोर येते आहे. या सॉफ्टवेअर इंजिनियरने आपल्या प्रेयसी सोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी पत्नीलाच जीवे मारले आहे. धक्कादायक म्हणजे तिच्या मृतदेहाचा फोटो देखील त्याने भारतात त्याच्या प्रेयसीला पाठवला.

असा लागला छडा 

अमेरिकेत राहणारा भारतीय वंशाचा सॉफ्टवेअर इंजिनियर अविनाश नारणे वय वर्ष 30 याने 5 जून 2025 ला रजिथा सबबिन यांच्याशी विवाह केला.  मिळालेल्या माहितीनुसार विवाहपूर्वीच त्याचे भारतातील त्याच्या प्रियसी सोबत संबंध होते. धक्कादायक म्हणजे या लग्नामध्ये त्याची प्रेयसी देखील उपस्थित होती.  दोघांमधला काटा दूर करण्यासाठी लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यात रजिथा हिला अविनाशने गळा दाबून मारले आणि तिचा मृतदेहाचा फोटो भारतातील त्याच्या प्रियसीला पाठवला.

अविनाशने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तो घरातून काही मिनिटांसाठी बाहेर गेला होता. पुन्हा आल्यानंतर त्याला बाथरूममध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला. खोकल्याचे औषध घेतल्या नंतर श्वासांवर परिणाम झाला असावा असं हे प्रकरण होतं. परंतु नऊ महिन्यांच्या तांत्रिक तपासातून अखेर अविनाश नारणे यानीच आपल्या पत्नीची हत्या केली असल्याचं निष्पन्न झाल आहे. दरम्यान याप्रकरणी अविनाश नारणे याला अटक करण्यात आली असून जामिनासाठी त्याला तब्बल 48 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. यानंतर पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार न्यायालयाने जर त्याला दोषी करार केले तर त्यास जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते.