महत्त्वाची बैठक : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न न्यायालयीन लढाई अधिक ताकदीने लढणार ! - टॉप न्यूज मराठी

मुंबई : आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,खासदार नारायण राणे आणि सीमा भागातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये सीमा प्रश्न असलेली न्यायालयीन लढाई ही अधिक ताकदिने लढण्याचा महत्त्वाचा ठोस निर्णय घेण्यात आला आहे. 

आजच्या सीमा प्रश्नाच्या उच्च अधिकारी समितीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न शरद पवार यांनी अनेक वर्षांपासून लढा दिला आहे. अद्याप देखील न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र हा एकत्रित झाला पाहिजे अशी ठोस भूमिका एकमतानं झाली आहे. 

या महत्त्वाच्या बैठकीकडे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे उपस्थित असल्याकारणाने इतर सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उपस्थित होते. परंतु रोहित पवार यांनी मात्र शिक्षक आंदोलनाला अधिक महत्त्व दिले. या बैठकीला उपस्थित राहता आले नाही याबाबत त्यांनी ट्विट देखील केले. परंतु रोहित पवारांच्या या गैरहजेरी बाबत अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.