मुंबई : सध्या एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे राज्याचे राजकारण देखील प्रचंड तापत चाललंय. एकीकडे उद्धव ठाकरे यांचे खासदार-आमदार त्यांची साथ सोडून सत्ताधारी बाकावर येऊन बसत आहेत. तर आता शरद पवारांच्या गटातूनही असाच काहीसा सूर आवळला जातोय अशी माहिती राज्यात चर्चेचा विषय ठरते आहे.
मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बड्या नेत्यांनी भाजपच्या बड्यां नेत्याची भेट घेतली अशी माहिती समोर असतानाच, आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. दरम्यान या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली याबाबत आता चर्चेला उधाण आल आहे. तर लगेचच शरद पवार यांनी आमदारांची देखील बैठक बोलावली, यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर आणि रोहित पाटील, अभिजीत पाटील हे उपस्थित होते.
एकंदरीतच हालचाली पाहता राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असणाऱ्या चर्चेवर शरद पवार हे देखील आता एनडीएला पाठिंबा देणार कि नेमकं काय ? या बाबत पूर्णविराम केव्हा लागेल याचीच वाट आता महाराष्ट्र पाहतो आहे.