"मजाक लावली आहे का ? प्लीज ते पोस्टर डिलीट करा..!" सौरव गांगुलींच्या बायोपिक पोस्टरवर नेटकरी नाराज, पोस्टर पाहिले का? - टॉप न्यूज मराठी

मनोरंजन : बॉलीवूडमध्ये आजपर्यंत अनेक बायोपिक बनवले गेले आहेत. लवकरच आता क्रिकेट खेळाडू सौरव गांगुली यांच्यावर देखील बायोपिक येतो आहे. ज्यामध्ये राजकुमार राव सारख्या उमद्या कलाकारान भूमिका साकारली आहे. पण नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे हे पोस्टर पाहून नेटकरी भडकले आहेत. 

तर झालं असं की सौरव गांगुली यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आल आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर खरंतर चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया येतच असतात. पण सौरव गांगुलीची भूमिका करणाऱ्या राजकुमार रावच्या या पोस्टरवर मात्र नेटक-यांनी चांगलंच तोंडसुख घेतल आहे. 2002 साली घडलेल्या एका घटनेवर हे पोस्टर आधारित आहे. साली भारताने नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा सौरव गांगुली यांनी अंगावरील शर्ट काढून तो हातात गोल गोल फिरवून सेलिब्रेशन केले होते. या त्यांच्या प्रतिक्रियेवरून त्यावेळी खूपच गदारोळ झाला होता. दरम्यान आता हे पोस्टर पाहून पुन्हा एकदा नेटकरी नाराज झाले आहेत. 

नेटकरी म्हणाले की, या पोस्टरचे एडिटिंग खूप खराब आहे, एआयच्या मदतीने चांगलं पोस्टर बनवता आलं असतं, प्लीज हे पोस्टर डिलीट करा, मजाक लावली आहे ? का अशा प्रक्रिया नेटक-यांनी दिल्या आहेत.  

या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता राजकुमार राव आहे. तर सौरव गांगुली यांच्या पत्नीच्या भूमिकेत तान्या मनिकतला या दिसणार आहेत. हा चित्रपट 14 मे 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.